Ekanth Khadse News: जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मला वाटलं की..."

Eknath Khadse Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath khadse
Eknath khadse Saam tv

Ekanth Khadse Latest News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली. अज्ञात व्यक्तींनी एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल ४ वेळा खडसेंना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकनाथ खडसेंनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे. (Breaking Marathi News)

Eknath khadse
Parinay Phuke Accident : भाजपचे माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात वाचला जीव

खडसेंना जीवे मारण्याची धमकी मिळताच जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. "सोमवारी सायंकाळापासून मंगळवारी सायंकाळपर्यंत साधारण ५ वेळा मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले".

"फोन करणाऱ्या व्यक्तीने दाउद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने मला धमकी दिली. आपकी कोई खैर नही, आपको मार देंगे, आपको मारना है, असं मला म्हटलं. सुरुवातीला मला वाटलं की, कुणी खोडसाळपणा करत असेल. पण त्यानंतर फोन येण्याचं प्रमाण वाढल्याने मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे", असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

अज्ञात व्यक्तीने खडसेंना फोनवरून काय म्हटलं?

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे फोनवरून धमकी देणाऱ्याने खडसेंना सांगितले. पहिल्यांदा असा फोन आल्यानंतर खडसेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आले. तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने खडसेंना दिली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खडसेंना कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती. खडसे यांच्या नावाने अनंत पाटील आणि सुनील पाटील या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ठार मारण्याची धमकी असल्याची पोस्ट एका व्यक्तीने फेसबुकवर टाकली होती.

Eknath khadse
Solapur Constituency : विराेधकांना मतदार ओळखतही नाहीत, माेदी फॅक्टर तर विसराच : प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टाेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com