गिरीश महाजनांनी खरेदी केली होती वतनाची जमीन, पण...; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

eknath khadse news : शरद पवार गटाच्या नेत्याने गौफ्यस्फोट केला आहे. भाजपच्या मंत्र्याने महार वतनाची जमीन खरेदी केली होती, पण नंतर पुन्हा परत केल्याचा आरोप खडसेंनी केली.
eknath khadse and girish mahajan news
Eknath Khadse and Girish MahajanSaam Tv
Published On
Summary

मंत्री गिरीश महाजन यांनी खरेदी केली होती वतनाची जमीन

आमदारकी धोक्यात येणार असल्याने जमिनीची खरेदी थांबवली

खडसेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे, त्यांची मुलगी शारदा यांच्याविरोधात महार वतनाची जमीन खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील स्वत: जमीन खरेदी केली होती. मात्र आमदारकी धोक्यात येणार असल्याने तातडीने परत केल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ खडसे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

eknath khadse and girish mahajan news
CM पद मिळावं म्हणून चंद्रकांतदादांनी अशोक खरातकडे केली अघोरी पूजा; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

आमदार एकनाथ खडसे यांनी महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोपावरून जळगावातील बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात एकनाथ खडसे हा एकमेव विरोधक असल्याने मला अडकवण्यासाठी कट कारस्थान केल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. सदरची जमीन ही महार वतनाची जमीन नव्हे तर वर्ग 1 ची जमीन आहे. तिची नियमानुसार खरेदी केल्याचा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे .

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या सभागृहात उत्तर देताना सदरची जमीन वर्ग 1 जमीन असल्याचं स्पष्ट केलंय. खुद्द महसूल मंत्र्यांनी जमीन वर्ग एक ची असल्याचा स्पष्ट केल्यानंतरही ती महार वतनाची असल्याचं ठपका ठेवून माझ्यावर दाखल झालेला गुन्हा बोगस असून नियमबाह्य असल्याचं आरोप खडसेंनी केला आहे.

eknath khadse and girish mahajan news
Maharashtra Live News Update: गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

महाराष्ट्राच्या विधानसभेचा, महसूलमंत्र्यांचा एकप्रकारे अवमान झाला असून हक्कभंग दाखल करण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याचं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस जेवढे तत्परता दाखवतात, तेवढी तत्परता अवैध धंदे बंद करण्यासाठी का दाखवत नाही, अशी टीका देखील खडसेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com