E-Sakal: सकाळची ई-क्षेत्रात उंच भरारी, देशात ठरलं नंबर- १ मराठी वेब पोर्टल

E-Sakal No.1 News Website: सकाळ माध्यम समूहाने डिजिटल पत्रकारितेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. २००० मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'ई-सकाळ' वेब पोर्टलला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे.
E-Sakal: सकाळची ई-क्षेत्रात उंच भरारी, देशात ठरलं नंबर- १ मराठी वेब पोर्टल
SAKALSAKAL
Published On

सकाळ मीडिया ग्रुपने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या प्रसारमाध्यम समूह म्हणून आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. न्यूजपेपर पासून ते डिजिटल क्षेत्रापर्यंत सकाळने सातत्याने प्रगती केली आहे. सकाळ माध्यम समूहाने डिजिटल पत्रकारितेमध्ये आपल्या वेगळ्या ओळखीचा ठसा उमटवत २५ वर्षांचा यशस्वी प्रवास आतापर्यंत पूर्ण केला आहे.

कॉमस्कोअरच्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये 'ई-सकाळ' हे सर्वाधिक जास्त वाचलं जाणारं मराठी संकेतस्थळ ठरले आहे. तब्बल १३.०५ मिलियन मासिक अॅक्टिव्ह युजर्स असलेल्या ई-सकाळने प्रतिस्पर्धींना जोरदार टक्कर देत आघाडी मिळवली आहे.

भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रादेशिक भाषांमध्ये ऑनलाइन कंटेंटची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे प्रादेशिक भाषांतील वाचकसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशामध्ये ई-सकाळ आपल्या वाचकांसाठी नवनवीन प्रयोग करत आहे आणि वाचकांचा आवडता कंटेट पूरवण्याचा प्रयत्न करत आहे.

E-Sakal: सकाळची ई-क्षेत्रात उंच भरारी, देशात ठरलं नंबर- १ मराठी वेब पोर्टल
E-Sakal: ये हुई ना बात! सकाळची ई-क्षेत्रातही घौडदौड, एक नंबर पटकावत आघाडीवर नाव; वाचकांची 'सकाळ'ला पसंती

२६ जानेवारी २००० रोजी सुरू 'ई-सकाळ' वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. या वेब पोर्टलला २०२५ या वर्षामध्ये २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २५ वर्षांच्या प्रवासात ई-सकाळ वेब पोर्टलने आपली वेगळी ओळख राखून आहे. सकाळ माध्यम समूहाच्या या पोर्टलमध्ये साम टीव्ही, दैनिक गोमन्तक, आणि ॲग्रोवन या इतर वेब पोर्टल्सचाही समावेश आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना विविध श्रेणीतील दर्जेदार कंटेंट वाचायला मिळतो.

E-Sakal: सकाळची ई-क्षेत्रात उंच भरारी, देशात ठरलं नंबर- १ मराठी वेब पोर्टल
E-Sakal: ई-सकाळचा नवा विक्रम – भारतात मराठी डिजिटल मीडियाचा सन्मान वाढवला!

अ‍ॅग्रोवन वेब पोर्टल:

सकाळ मीडिया ग्रुपच्या वेब पोर्टलमध्ये अ‍ॅग्रोवन हे न्यूज पोर्टल आहे. अ‍ॅग्रोवन न्यूज पोर्टल आधुनिक शेती, हवामान अंदाज, कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन यासंबंधीत माहिती पोहोचवण्याचे काम करते.

गोमन्तक वेब पोर्टल:

सकाळ मीडिया ग्रुपच्या वेब पोर्टलमध्ये गोमन्तक वेब पोर्टलचा समावेश आहे. गोव्यातील सर्व घडामोडी 'गोमन्तक' या सकाळ समुहाच्या अंतर्गत असलेल्या वेब पोर्टलमध्ये वाचायला मिळतात. यात गोव्याच्या घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम , पद्धती, राजकीय, सामाजिक आणि पर्यटनाविषयक बातम्यांसाठी हे एक विश्वासार्ह वेब पोर्टल म्हणून ओळखले जाते.

E-Sakal: सकाळची ई-क्षेत्रात उंच भरारी, देशात ठरलं नंबर- १ मराठी वेब पोर्टल
E-Sakal: ई-सकाळची यशस्वी घोडदौड; २५ वर्षे वाचकांच्या पसंतीचे डिजिटल प्लॅटफॉर्म

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com