ड्रोन फवारणी फायद्याची ठरत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढतोय!

अकोल्यातील दानापूर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी हे ड्रोन द्वारे फवारणी करत आहेत. ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर औषधांची मोठया प्रमाणावर बचत होत असल्याचे शेतकरी म्हणाले.
drone spraying
drone sprayingsaamtv
Published On

अकोला : आता पिकांवरील कीड नियंत्रणात कीटकनाशक फवारणीसाठी शेतकरी ड्रोनचा वापर करताना दिसत आहे. अकोल्यातील (Akola) दानापूर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी हे ड्रोन द्वारे फवारणी (Drone Spraying) करत आहेत. गोपाल येऊल यांच्या 10 एकर टोमटो पिकावर आधुनिक ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. या ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर औषधांची मोठया प्रमाणावर बचत होत असल्याचे यावेळी संजय येऊल यांनी सांगितले.

हे देखील पहा :

दानापूर सह इतर ही ठिकाणी शेतकरी ड्रोन फवारणीकडे वळताना दिसत आहेत. अलीकडच्या काळात यांत्रिक शेतीवर (Farming) अधिक भर दिला जात आहे, त्यामुळे खर्च आणि वेळेतही बचत होत आहे. पूर्वी पेरणीसाठी पारंपरिक पद्धतीत तिफण, बैलजोडी आणि मानवाचा वापर व्हायचा. सिंचनासाठी मोटेचा वापर करताना बैलजोडी व माणूसही लागत असायची.

drone spraying
Nagpur : भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या भावासह एकावर अज्ञातांकडून हल्ला!

तर, कापणी आणि मळणीसाठीही मजुरांचा वापर होत असे, आता ही सर्व कामे यंत्राने होत असल्याने मजुरांचा वापर कमी झाला असून, वेळेची व पैशांचीही बचत होत आहे. आता त्यात फवारणीचाही समावेश होणार असून, आता फवारणीसाठी मजुराऐवजी ड्रोनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. यावेळी गावासह परिसरातील गावातील शेतकरी (Farmers) वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com