किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी!

सोलापुरात पूर्व भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या फ्रूट बीअरमध्ये चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावरून अन्न प्रशासनाने फ्रूट कंपनी आणि विक्रेत्यांवर जेलरोड आणि वळसंग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी!
किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी! विश्वभूषण लिमये
Published On: 

सोलापूर - सोलापुरात पूर्व भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या फ्रूट बीअरमध्ये चक्क ड्रेनेजच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावरून अन्न प्रशासनाने फ्रूट कंपनी आणि विक्रेत्यांवर जेलरोड आणि वळसंग पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. अन्नसुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्त नगरातील गिरी झोपडपट्टीतील ओम साई ड्रिंक्सचा मालक बलराम बंदाराम, नीलम नगरातील गंडे चौकातील विक्रेता सुरेश भीमराव विटकर यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

हे देखील पहा :

तसेच गोदुताई विडी घरकुलमध्ये दुकानात सापडलेल्या फ्रूट बीअरप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साई ड्रिंक्सचे अमरसिद्ध पिंडीपोल, शिवराज चिंचोळ यांच्याविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात विक्री होणाऱ्या फ्रूट बीअरमध्ये धोकादायक पदार्थांची भेसळ होत असल्याची तक्रार आली होती.

किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल
किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी!
नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार!
किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी!
विनाशकाले विपरीत बुद्धी! पैशांच्या वाटपावरून दरोडेखोरांचा वाद; एक झाला फितूर

त्यानुसार त्यांनी फ्रूट बीअर विक्रीच्या दुकानावर छापे मारून नमुने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी गिरी झोपडपट्टी,कुंभारीतील गोदुताई विडी घरकुलमधील पाच फ्रूट बीअर विक्रीच्या दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या दुकानांमधील ६०८ बाटल्या करून नमुने जप्त तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. प्रयोगशाळेने धक्कादायक अहवाल दिला. फ्रूट बीअरमधील पाणी मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे नमूद केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com