Dr Richa Rupnar Death Case: डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुख्य आरोपी सुरज रूपनरला अटक

Shiv Sena leader Bhausaheb Rupnar Arrested: डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात शिवसेना नेत्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय .
डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी  अपडेट
Dr Richa Rupnar Death CaseSaam Tv

भरत नागणे, साम टीव्ही पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यात डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येमुळं वातावरण तापलेलं आहे. आता याप्रकरणी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात डॉ. ऋचा रूपनरचे सासरे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर यांना अटक करण्यत आली आहे. तर पती सुरज रूपनर अद्यापही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून सांगोला पोलिसांनी अटक केली आहे. सुरज रूपनरला आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूरज रूपनरच्या अटकेनंतर खरा प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडियन मेडीकल असोसिएशनच्या आंदोलनानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत (Dr Richa Rupnar Death Case) आहे. डॉ. ऋचा रूपनरने डॉ. सुरज रूपनरला (पती) कंटाळून आत्महत्या केली होती. या हायप्रोफाइल घटनेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे. आता याप्रकरणी शिवसेना नेते रूपनर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नवऱ्याच्या शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने ६ जून रोजी सांगोला येथे राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली (Shiv Sena leader Bhausaheb Rupnar) होती. ही घटना सांगोलामध्ये घडली होती. घटनेनंतर तीन दिवसांनी डॉक्टर सुरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या हायप्रोफाईल घटनेनंतर सांगोला आणि पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं दिसत आहे. यांचं लग्न २०१२ मध्ये झालं होतं त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत.

डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी  अपडेट
Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

सुरज हा ऋचाला वारंवार मानसिक आणि शारिरीक त्रास देत होता. सतत पैशाची मागणी करत होता. शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण तसंच शारीरिक मानसिक त्रास देत सातत्याने धमकावत (Solapur News) होता. एमआरआय मशीन विकत घेण्याकरीता माहेरून पैसे आण, नाहीतर आत्महत्या (Richa Rupnar) कर असं ऋचाला वारंवार म्हणत होता. याप्रकरणी ऋचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटीलने तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी कारवाई करत डॉ. ऋचा यांच्या सासऱ्यांना अटक केली आहे.

डॉ. ऋचा रूपनर आत्महत्येप्रकरणी  अपडेट
Mumbai Police officer ends life : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com