Diksha bhoomi nagpur : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध; आंदोलकांकडून बांधकाम साहित्याची तोडफोड,VIDEO

Diksha bhoomi underground parking : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेकरी अनुयायांनी विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी आंदोलकांनी पार्किंगची तोडफोड केली.

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : नागपुरातील आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध दर्शवला आहे. दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत दीक्षाभूमीजवळ अंडरग्राऊंड पार्किंग बांधली जात आहे. या अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी समाज बांधवाने विरोध दर्शवला आहे.

दीक्षाभूमीजवळील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी विरोध दर्शवत घटनास्थळी पोहोचले. या कामाच्या विरोधात मोठ्या संख्यने आंबेडकरी समाजबांधव दीक्षाभूमीवर एकत्र आले आहे. आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या चर्चेसाठी वेळ दिला होता. मात्र, आज आंदोलकांनी संतप्त भूमिका घेतली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी या कामाची बांधकाम साहित्याची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com