AMU Dog Attack : हृदय पिळवटून टाकणारी घटना! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू; धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे. सदर घटनेमुळे विद्यापीठात भीतीचे वातावरण पसरले आहे.
AMU Dog Attack
AMU Dog AttackSaam TV
Published On

Uttar Pradesh Dog Attack : भटक्या कुत्र्यांच्या समस्या सर्वच शहरांमध्ये जाणवतात. अशात अलीगड मुस्लिम विद्यापीठातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने एका शिक्षकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सदर घटना विद्यापीठात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे. सदर घटनेमुळे विद्यापीठात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. असद असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी सौदी अरेबिया येथे राहतात. डॉ. असद यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटना घडली तेव्हा डॉ. असद हे कॅम्पसमध्ये नमाज अदा करण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथे दोन कुत्रे आले. या दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्यावर भूंकण्यास आणि त्यांना चावण्यास सुरूवात केली. यामुळे डॉ. असद यांनी या दोन्ही कुत्र्यांना तेथून दूर केले.

AMU Dog Attack
Crime News: जावयाची सासऱ्याला बांबुने मारहाण; मुलीला नांदायला घेऊन जा सांगितल्‍याने आला राग

ते दोन कुत्र्यांना हाकलत असतानाच एका पाठोपाठ एक असे ८ ते ९ कुत्रे तेथे जमले. कुत्र्यांचं एवढं मोठं टोळक पाहून डॉ. असद घाबरले होते. आपली सुटका करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांचं टोळकं त्यांच्यावर तुटून पडलं होतं. कुत्र्यांनी त्यांच्या अंगावर सर्वत्र चावा घेतला. अंगाचे लचके तोडल्यांने डॉ. असद हे जागीच खाली कोसळले. त्यानंतर कुत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

यूपीमध्ये ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी भटक्या कुत्र्यांवर काहीतरी उपाय करण्याची मागणी केली आहे. या आधी देखील यूपीमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक जनावरे भटक्या पद्धतीने बाहेर मोकाट फिरत आहेत. या आधी बैलाने एका व्यक्तीला उडवून दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता या घटनेचा व्हिडिओ काळीज हेलावणारा आहे.

AMU Dog Attack
Delhi Viral News : भावाच्या लग्नात नाचताना 19 वर्षीय मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com