Dilip Walse Patil : आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो हेच स्वातंत्र्य उद्या राहील की नाही...;दिलीप वळसेपाटलांना का वाटतेय ही भीती?

आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याऐवजी किंवा चर्चा करण्याऐवजी एक धार्मिक अजेंडा राबवला जात आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSaam Tv
Published On

Dilip Walse-Patil : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने खडाजंगी सुरू आहे. आज शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला जात आहे. तसेच काही नेत्यांकडून महापुरुषांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केले गेले. याने देखील आरोप प्रत्यारोप सुरू होते. अशात आता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकारणाच्या एकंदर परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो हेच स्वातंत्र्य राहील की नाही, असं वळसे पाटलांनी म्हटलं आहे. (Latest Dilip Walse Patil News)

आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याऐवजी किंवा चर्चा करण्याऐवजी एक धार्मिक अजेंडा राबवला जात आहे. असे प्रयत्न सुरू आहे की,महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांनी काहीच केलं नाही आणि जे काही केलं ते आम्ही केलं आणि एकप्रकारे इतिहास बदलण्याचं व पुसण्याच प्रयत्न होत असल्याची टीका राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.

आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो हेच स्वातंत्र्य राहील की नाही, देशातली न्याय व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे, अशी भिती माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी व्यक्त केलीय.

Dilip Walse Patil
Devendra Fadnavis News: मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, फडणवीसांचा आरोप; दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं...

तरुणांना चुकीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न

पुढे संभाजी भिडे गुरुजींच्या गडकिल्ले मोहिमेवर माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटलांनी निशाणा साधलाय. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे विविध भूमिपूजन कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आले होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

Dilip Walse Patil
Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस; 'ते' वक्तव्य भोवणार?

आदिवासी युवकांना घेऊन संभाजी भिडे गुरुजींनी श्री क्षेत्र भिमाशंकर ते किल्ले शिवनेरी असा पायी प्रवास करत आदिवासी बांधवांना घेऊन गड किल्ले मोहिम काढली. या मोहिमेवर राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटीलांनी लक्ष करत म्हणाले, किल्ले आणि धार्मिक ठिकाणी जायला आमचा विरोध नाही, पण याच्यामधून एका विशिष्ट समाजामध्ये जी भावना पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, तरुणांना चुकीची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही वळसेपाटलांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com