Devendra Fadnavis News: मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, फडणवीसांचा आरोप; दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

Maharashtra Politics : गेल्या दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

Devendra Fadnavis
Karuna Sharma : करुणा शर्मासह एकावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

एवढंच नाही तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला एका कार्यक्रमात भेटल्या होत्या तेव्हा मी म्हटलं की उद्धवजींना नमस्कार सांगा कारण मी त्या वृत्तीचा नाही असंही देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमातल्या मुलाखतीत ते बोलत होते.

"ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं मी कोणताही काम केलं नव्हत, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत" असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis
Republic Day Fashion : रिपब्लिकडेच्या दिवशी थोड वेगळं दिसायचयं , करून पहा तुमच्या फॅशनमध्ये हे बदल

दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारनं मला अडकवण्यासाठी संजय पांडे यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलाय. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. माझ्या गृहमंत्री पदाच्या काळात असा प्रकार घडलेला नाही.महाविकास आघाडी सरकारमध्ये अशी कोणतीही योजना नव्हती.त्यांच्या माहितीच्या आधारे फडणवीस बोलले असतील.पण महाविकास आघाडी सरकारमध्ये असा प्रकार झालेला नाही असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com