Dhule News : अवैध दारूची वाहतूक रोखली; कंटेनरसह दोघे पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : मध्यप्रदेशकडून गुजरातच्या दिशेने अवैधपणे कंटेनरमध्ये दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त माहितीदारामार्फत शिरपूर पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली
Dhule News
Dhule NewsSaam Tv
Published On

धुळे : दारू विक्री व वाहतुकीस बंदी असताना अवैधपणे वाहतूक सुरुच असल्याचे शिरपूरमध्ये झालेल्या कारवाईने (Dhule) समोर आले आहे. मध्यप्रदेशमधून गुजरातकडे शिरपूरमार्गे कंटेनरमधून दारूची अवैधपणे वाहतूक केली जात होती. (Shirpur) शिरपूर तालुका पोलिसांनी ही वाहतूक रोखत लाखो रुपयांचा मुद्देमाल व दारू साठा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे, (Latest Marathi News)

Dhule News
Vagitable Price Hike : पालेभाज्यांचे दर कडाडले; आवक घटल्याचा परिणाम 

मध्यप्रदेशकडून गुजरातच्या दिशेने अवैधपणे कंटेनरमध्ये दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त माहितीदारामार्फत शिरपूर पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस (Shirpur Police) अधिकाऱ्यांनी एक पथक तैनात करत ही अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी आदेशित केले होते. त्यानुसार पळासनेर या ठिकाणी सापळा रचत शिरपूर तालुका पोलिसांना (Police) माहिती मिळालेला कंटेनर आढळून आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Yewla Nagarpalika : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अनोखा फंडा; नगरपालिकेची बँण्ड बाजा बजाओ मोहीम

४८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी कंटेनर थांबवत यात असलेल्या मालासंदर्भात चालकास विचारणा केली. मात्र चालकातर्फे उडवाउडवीचे उत्तरे मिळाल्यानंतर संबंधित कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. त्या ठिकाणी पंचांसमोर कंटेनरची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या दारूचा साठा पोलिसांना आढळून आला आहे. जवळपास ४८ लाखाहून अधिकचा दारूसाठा पोलिसांनी यावेळी हस्तगत केला असून, या कारवाईत दोघा जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com