Bribe Case : घरकुलाचा धनादेश काढण्यासाठी घेतली १ हजाराची लाच; गृहनिर्माण अभियंता ताब्यात

Sakri News : शबरी आवास योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये घोडदे येथे घरकुल मंजूर झाले. बांधकामाचे छायाचित्र काढून नजरी तपासणीनंतर मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर
Sakri Bribe Case
Sakri Bribe CaseSaam tv

साक्री (धुळे) : शबरी आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाचा धनादेश काढून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात (Dhule) तक्रारदाराकडे हजार रुपयांची मागणी केली. यानंतर लाच (Bribe) स्वीकारताना येथील पंचायत समितीचा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदीपराव शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. (Maharashtra News)

Sakri Bribe Case
Jalgaon Temperature : उष्णतेची लाट..जळगाव जिल्ह्याचे तापमान पुन्हा ४२ अंशावर

शबरी आवास योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये घोडदे येथे घरकुल (Gharkul) मंजूर झाले. बांधकामाचे छायाचित्र काढून नजरी तपासणीनंतर मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराने (Sakri) पंचायत समितीतील घरकुल विभागातील गृहनिर्माण अभियंता परेश शिंदे यांची भेट घेतली. यावर शिंदेने मंजूर घरकुलाचे छायाचित्र काढून नजरी तपासणी करून त्याचे मूल्यांकन पंचायत समिती कार्यालय सादर केले.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sakri Bribe Case
Kalyan News : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीत गुन्हा दाखल; परवानगी न घेता लावले होर्डिंग

धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली. घोडदे (ता. साक्री) येथील तक्रारदाराने (Dhule ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १५ एप्रिलला याबाबत तक्रार केली. याची पडताळणी करत शिंदेने तक्रारदाराकडून एक हजाराची लाच घोडदेलगत बसस्थानकजवळ स्वीकारली. यानंतर एसीबीने शिंदे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी परेश शिंदे याच्याविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com