Kalyan News : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीत गुन्हा दाखल; परवानगी न घेता लावले होर्डिंग

Kalyan News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असल्याने या काळात राजकीय पक्षांना होर्डिंग किंवा बॅनर लावायचे झाल्यास त्याची सरळ परवानगी घ्यावी लागते.
Manpada Police
Manpada PoliceSaam tv

अभिजित देशमुख 

कल्याण : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. निवडणूक आयोग व स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून यावर बारकाईने लक्ष आहे. यात (Kalyan) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी पहिला गुन्हा (Manpada Police) मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. (Tajya Batmya)

Manpada Police
Akkalkuwa Accident : मालवाहू गाडी नदीत कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता लागली असल्याने या काळात राजकीय पक्षांना होर्डिंग किंवा बॅनर लावायचे झाल्यास त्याची सरळ परवानगी घ्यावी लागते. परंतु (Dombivali) डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोडवरील परिसरात एका जाहिरात एजन्सीकडून चार कोटी पक्की घरे बांधली आहेत, आणखी बांधली जातील, मोदींची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा" अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगसाठी कोणतेही परवानगी घेण्यात आलेली नाही.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manpada Police
Jalgaon Temperature : उष्णतेची लाट..जळगाव जिल्ह्याचे तापमान पुन्हा ४२ अंशावर

एजन्सी विरोधात गुन्हा 

या विना परवानगी लावण्यात आलेल्या होर्डिंगबाबत तक्रार आली होती. यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार  यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संबंधित एजन्सी एडी प्रमोशन ऍडव्हर्टायझिंग सर्विसेस विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com