एकाच विहिरीत आढळले दोन भले मोठे अजगर

एकाच विहिरीत आढळले दोन भले मोठे अजगर
अजगर
अजगर
Published On

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथील शेतकरी गुलाब बंडु सदाराव यांच्या शेतातील विहीरीत साधारण ८ फुटाचा अजगर आढळून आल्याची घटना घडली आहे. सर्पमित्राने अजगराला जिवंत बाहेर काढले. (dhule-news-Two-big-dragons-found-in-the-same-well)

अजगर
वाघुरचे आठ दरवाजे उघडले; पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग

झोतवाडे येथील गुलाब सदाराव यांच्‍या शेतात असलेल्‍या विहिरीत दहा दिवसांपूर्वी साडेसहा फुटाचा अजगर आढळुन आला होता. त्याला देखील सर्पमित्रांच्या मदतीने शिताफीने पकडण्यात आले होते. आज पुन्हा त्‍याच विहिरीत अजगर आढळून आला. या अजगरास देखील विहिरीतून बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश आले असून जवळपास दहा दिवसांमध्ये एकाच विहिरीतून दोन भल्यामोठ्या अजगरांना सर्पमित्रांना जीवनदान दिले आहे. परिसरातील नागरिकांनी सर्प मित्रांचे आभार मानले असून एकाच विहिरीमध्ये दहा दिवसांमध्ये दोन भले मोठे अजगर आढळल्याने मात्र परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com