Dhule NCP : शरद पवार गटाकडून काळ्या फित लावून निषेध; भाजप नेत्यांसह अजित पवारांच्या पोस्टरला मारले जोडे

Dhule news : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंत पक्ष व चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय बाकी होता. निवडणूक आयोगातर्फे याबाबत ६ फेब्रुवारीला निर्णय देण्यात आला.
Dhule NCP
Dhule NCPSaam tv
Published On

धुळे : निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात देण्यात आलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने काळ्या फिती लावून (Dhule) धुळे शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला. निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत घोषणाबाजी देखील करण्यात आली. (Live Marathi News)

Dhule NCP
Cotton Price : उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही हिंगोलीत नियमांची पायमल्ली; हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी

राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंत पक्ष व चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय बाकी होता. निवडणूक आयोगातर्फे याबाबत ६ फेब्रुवारीला निर्णय देण्यात आला. मात्र देण्यात आलेला निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध करण्यात आला. हा निर्णय मोदी, शहा व फडणवीसांचा असून जनतेला खरी राष्ट्रवादी कुणाची हे माहीत असून, याचे उत्तर जनता आगामी निवडणुकांमधून दाखवून देईल; असा विश्वास देखील यावेळी निषेधकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule NCP
Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक पडली महागात; डॉक्टरची साडेसात लाखात फसवणूक

फोटोला मारले जोडले 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. तसेच  यावेळी नरेंद्र मोदी त्याचबरोबर अमित शहा व देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com