Dhule Congress
Dhule CongressSaam tv

Dhule Congress : माजी आमदाराच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या बैठकीत वाद; पदाधिकाऱ्यांमध्ये झाली झटापट

Dhule News : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन हे धुळे दौऱ्यावर आले होते.
Published on

धुळे : भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित बैठकित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली. बैठकीत माजी आमदार डी. एस. अहिरे यांनी मागील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी विरोधकांना मदत केल्याचे वक्तव्य केले. यावरून वादाला सुरवात झाली होती. 

अखिल भारतीय (Congress) काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन हे धुळे (Dhule) दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात साक्री विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डी. एस. अहिरे यांनी आपले विचार मांडतांना मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार अहिरे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पाडण्यात विरोधकांना मदत केल्याची खंत व्यक्त केली. यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. यानंतर वाद वाढला. 

Dhule Congress
Hingoli News : मुलीसोबत शाळेत गैरवर्तन करणं शिक्षकाला पडलं महागात; प्रशासनाने दाखवला थेट घरचा रस्तानिलंबन

दरम्यान माजी आमदार डी. एस. अहिरे आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने दोन्ही एकमेकांच्या अंगावर धावून आले. यामुळे काँग्रेस भावनामध्ये सुरू असलेल्या बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उपस्थित राष्ट्रीय सचिव निजामुद्दीन यांनी यादरम्यान मध्यस्थी केली. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी देखील मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com