धुळे : मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला भाजपचे विद्यमान (Dhule) खासदार सुभाष भामरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. खासदार भामरे (Subhash Bhamre) यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा देत राज्य सरकारला घरचा आहेरच दिला आहे. (Live Marathi News)
मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोला सुरु आहेत. यात धुळे येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनस्थळी भाजपच्या विद्यमान महापौर प्रतिभा चौधरी त्याचबरोबर (BJP) भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी खासदार सुभाष भामरे यांनी मराठा आंदोलकांची भेट घेत मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे मराठा आंदोलनामुळे राज्य सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढलेली असताना दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आश्वासनाचे दिले पत्र
खासदार सुभाष भामरे यांनी आंदोलनस्थळी जात पाठिंबा दिला आहे. याशिवाय मराठा समाजास आरक्षण (Maratha Reservation) द्यावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे देखील स्पष्ट केले. याबाबतचे पत्रच खासदार सुभाष भामरे यांनी आंदोलनस्थळी पोहोचवून मराठा आंदोलकांना दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.