Dhule Accident CCTV: धुळ्यात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Dhule Bike And Container Accident CCTV Video: धुळे शहरातील देवपूर परिसरात अपघाताची ही घटना घडली होती. समोरून दुचाकीवरून येणारी महिला रस्ता क्रॉस करत होती. ही महिला अचानक समोर आल्यामुळे दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
Dhule Accident CCTV: धुळ्यात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Dhule Accident

भूषण अहिरे, धुळे

धुळ्यामध्ये कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची (Dhule Accident) घटना समोर आली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरकार उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील देवपूर परिसरात अपघाताची ही घटना घडली होती. समोरून दुचाकीवरून येणारी महिला रस्ता क्रॉस करत होती. ही महिला अचानक समोर आल्यामुळे दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दुचाकीस्वार गाडीसह रस्त्यावर पडला. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने त्याला चिरडले.

Dhule Accident CCTV: धुळ्यात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Dhule News : धुळ्यात दोन दारू दुकान मालकांवर गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलांना दारू विक्री

कंटेनरच्या पुढील चाकाखाली डोकं आल्यामुळे या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. हा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. हा तरुण १८ ते २० वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे. देवपूर पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

Dhule Accident CCTV: धुळ्यात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Dhule News : ट्रकचालकाने दुचाकीचालकाला चिरडलं; संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक

या अपघातानंतर घटनास्थळावर एकच खळबळ उडाली. नागरिकांनी कंटेनरची तोडफोड केली. यावेळी देवपूर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी देवपूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून ते पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती

Dhule Accident CCTV: धुळ्यात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान, रस्त्यावर झाडे पडली...पिकांसह घरांचे नुकसान; वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com