Dhule News: धुळ्यात नरभक्षक बिबट्याचा हैदोस; हल्यात जखमी झालेल्या तिसऱ्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Dhule Latest News: धुळे तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा चांगलाच हैदोस सुरू आहे.
Dhule News
Dhule NewsSaamtv
Published On: 

Dhule News:

धुळे तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा चांगलाच हैदोस सुरू आहे. यापूर्वी दोघा बालकांवर या नरभक्षक बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन बालके जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता बिबट्याने हल्ला केलेल्या तिसऱ्या बालकाचा देखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे तालुक्यातील (Dhule) मोहन शिवारात रमेश नरसिंह दुडवे (पावरा) हा नऊ वर्षाचा मुलगा आपल्या कुटूंबासोबत झोपला होता. रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला व त्याला शेतात ओढून नेले, कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केली.

त्यानंतर बिबट्याने बालकाला त्याच ठिकाणी टाकून पळ काढला होता. बिबट्याच्या या हल्ल्यात बालकाच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यास तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. आज या बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Maval News: आमच्याकडे जमीन नाही, नोकरी नाही जगायचं कस; मावळच्या किवळे मामुर्डी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन

दरम्यान, याआधी धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) लहान मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तालुक्यातीलच बोरकुंड येथील सहा वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. परिसरात बिबट्याचा हैदोस पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

Dhule News
Kanhaiya Kumar in Mumbai : महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल, कन्हैय्या कुमार यांचा भाजपवर घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.