Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News: खुर्चीला नतमस्तक करत सोडला पदभार; प्रदीप कर्पे यांचा महापौरपदाचा राजीनामा

खुर्चीला नतमस्तक करत सोडला पदाभार; प्रदीप कर्पे यांचा महापौर पदाचा राजीनामा
Published on

धुळे : धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांनी आपल्या महापौर पदाचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर महापौर पदाचा राजीनामा दिला. मावळते महापौर प्रदीप कर्पे (Padip Karpe) यांनी महापौर पदाचा राजिनामा देवून खुर्चीला नतमस्तक करत पदाभार सोडला आहे. (Tajya Batmya)

Dhule News
Dhule News: लंम्‍पी स्कीन प्रादुर्भाव कमी; तब्बल पाच महिन्यानंतर जनावरांचा बाजार सुरू

धुळे महानगराच्या (Dhule Corporation) विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी जो विश्वास दाखवून मला महापौर पदाची संधी दिली. त्या संधीचा उपयोग शहराच्या विकास कामांना चालना देत अधिकाधिक निधी आणून कामे केल्‍याचे कर्पे यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे, पाण्याचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, नविन जलकुंभाची निर्मीती सोलर सिस्टीम, पाणी पुरवठा यंत्रणा सुधारणा ही कामे आपण मार्गी लावली, देवपूरातील रस्त्यांची कामे सुरु केली. अशी माहिती मावळते महापौर प्रदीप कर्पे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com