Dharashiv ST Bus Accident : धाराशिव कुपेरी घाटात एसटी बसला अपघात, दोनदा उलटून दरीत कोसळली

Dharashiv ST Bus Accident: मालवण आगारातून सुटणारी मालवण बार्शी या एसटी बसचा कुपेरी घाटीत उताराच्या वळणावर अपघात झाला.
Dharashiv Accident
Dharashiv Accident Saam TV
Published On: 

विनायक वंजारे

Dharashiv News : धाराशिवमध्ये एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मालवण आगारातून सुटणारी मालवण बार्शी या एसटी बसचा कुपेरी घाटात उताराच्या वळणावर अपघात झाला. चालत्या बसचे स्टेअरिंग लाँक झाल्याने बस रस्त्याच्या 12 फूट खाली कोसळून अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला कोसळून दोन वेळा पलटी होत एसटी उभी राहिली. (Latest Marathi News)

Dharashiv Accident
Sambhajinagar News: कुत्र्याने पळवला माजी महापौरांचा बूट; CCTV फुटेजवरून घेतला शोध, अखेर कुत्रा सापडला पण बूट...

या आपघातात 18 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून अपघातात मालवण आगारातील एसटी चालक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

Dharashiv Accident
Vegetables Price Hike : महागाईने पिचलेल्या सर्वसामन्यांना आणखी एक झटका; सर्वच भाज्या महागल्या, मिरचीने गाठली शंभरी

पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालक तसेच कुणकावळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मदत केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवण आगाराचे व्यवस्थापक आणि कर्मचारी चालक यांनीही अपघातस्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com