Sambhajinagar News: कुत्र्याने पळवला माजी महापौरांचा बूट; CCTV फुटेजवरून घेतला शोध, अखेर कुत्रा सापडला पण बूट...

Nandkumar Ghodele Shoes: छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा १५ हजारांचा बूट त्यांच्या घराच्या दारासमोरून मोकाट कुत्र्याने पळवला.
Chhatrapati Sambhaji Nagar Nandkumar Ghodele Shoes News
Chhatrapati Sambhaji Nagar Nandkumar Ghodele Shoes NewsSaam TV
Published On

Chhatrapati Sambhaji Nagar: माजी महापौराचा बूट कुत्र्याने पळवल्यानंतर त्या कुत्र्याला शोधण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली. हे ऐकून तुम्हाला नवल वाटलं असेल, पण ही घटना छत्रपती संभाजीनगरामध्ये घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा १५ हजारांचा बूट त्यांच्या घराच्या दारासमोरून मोकाट कुत्र्याने पळवला. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhaji Nagar Nandkumar Ghodele Shoes News
Akola Crime News: फेसबुकवरील ओळख, नाव बदलून ३२ वर्षीय विवाहितेला फसवलं; पती घरी नसताना यायचा अन्...

त्यानंतर महापालिकेची यंत्रणा तो बूट चोरणारा कुत्रा शोधण्याच्या कामाला लागल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात घुसलेल्या दोन कुत्र्याने बूट पळवल्याचे सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage) दिसून आले. सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने तीन कुत्र्यांना पकडलं. पण नेमका बूट कोणत्या कुत्र्याने पळवला, हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं.

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे इटखेडा (Chhatrapati Sambhajinagar) भागात निवासस्थान आहे. शनिवारी रात्री ते घरी आले. नेहमीप्रमाणे आपला बूट दारासमोर काढला आणि घरात जाऊन झोपी गेले. सकाळी पाहतात तर एक बूट गायब झाला. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर बूट कुत्र्याने नेल्याचे समोर आले.

त्यामुळे घोडेले यांनी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून परिसरात मोकाट श्वान वाढले असून, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना करत बूटच श्वानाने नेल्याचे सांगितले. त्यानुसार तातडीने श्वान पकडणारी गाडी इटखेडा भागात आली. त्यांनी मोकाट कुत्र्यांचा शोध घेत तीन कुत्र्यांना पकडले, पण महापौरांचा बूट काही सापडला नाही. या तीनही कुत्र्यांना कोंडवाड्यात पाठविण्यात आले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com