बालाजी सुरवसे
Teacher's Examination: धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्याने जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर एक ते दोन शिक्षक वगळता कोणीही फिरकले नसल्याचा प्रकार समोर आला. (Latest Marathi News)
शिक्षकांचे विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे, स्पर्धात्मक वातावरणात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळावी, विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांकरिता (Teachers) या परीक्षेचे आयोजन केले होते.
मात्र या परीक्षेकडे जिल्ह्यातील शिक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान विभागीय आयुक्तांनी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यापूर्वी सर्व संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि परीक्षे विषयी माहिती दिली होती. ही परिक्षा ऐच्छिक होती त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते तेव्हा सर्व संघटनांनी संमती दिली होती. मात्र या परीक्षेला जिल्ह्यातील शिक्षकांनी व अनेक संघटनांनी विरोध दर्शवत परीक्षेला हजर न राहील्याने परीक्षा केंद्रे ओस पडली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.