धाराशिवात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; थेट बॅनरवरून गायब केला आमदाराचा फोटो

BJP Internal Rift: धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद उघड झाला आहे. सत्कार कार्यक्रमाच्या बॅनरवरून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा फोटो वगळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून खासदार ओमराजे निंबाळकरांना प्रमुख स्थान देण्यात आले होते.
BJP Internal Rift:
DHARASHIV BJP BANNER ROW: INTERNAL RIFT SURFACES AS MLA'S PHOTO GOES MISSING
Published On
Summary
  • धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद बॅनरवरून उघड झाला.

  • सत्कार कार्यक्रमातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना वगळण्यात आल्याची चर्चा.

  • नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला राजकीय रंग

धाराशिव जिल्ह्यातील राजकारण आज चांगलंच तापलंय. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांच्या रूपामाता परिवारातर्फे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमातून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना वगळण्यात आलंय.

तर दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मात्र मानाचे स्थान देण्यात आलं. फ्रेन्डशीप डेचा धागा पकडत भाजपची व आमची मैत्री ही दिलसे दिल तक असल्याचं खासदार ओम राजे निंबाळकरांनी सांगितलं तर ओमराजेचा हाच धागा पकडत बसवराज पाटील यांनीही त्यांना दाद दिली.

BJP Internal Rift:
Maharashtra Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; बड्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

मात्र भाजपमधील नेत्यांमध्ये असलेले वाद सर्वांसमोर उघड झालेत. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप व्यंकटराव गुंड यांनी केला. माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी देखील परखड भाष्य करत भारतीय जनता पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसून कोणा एका कुटुंबाच्या जीवावर चालत नसल्याचा हल्लाबोल केला.

BJP Internal Rift:
Politics: भाजपमध्ये भलं मोठं खिंडार, धडाधड 100 कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे; राजकीय वर्तुळात खळबळ

धाराशिव जिल्ह्यातील भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत असंतोष आता चव्हाट्यावर आलाय. पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात थेट एल्गार पुकारला. विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपमधील हा 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले.

आमदाराला डावललं अन् ओमराजे निंबाळकरांना दिलं मानाचं स्थान

नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेसह मुख्य बॅनरवरून स्थानिक भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव आणि फोटो पूर्णपणे डावलण्यात आला. एकीकडे पक्षाच्या स्वकीय आमदाराला डावलले गेलं.

दुसरीकडे सहकारी पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मात्र या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मानाचे स्थान देण्यात आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ, जुने आणि निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com