मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सरकारला घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या १७ दिवसांपासून त्यांनी केलेलं उपोषण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं. (Latest Marathi News)
त्यांनी उपोषण सोडल्यानंतर सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. आज गावोगावी बौलपोळा सण साजरा केला जात आहे. अशात उपोषण सोडल्यावर एका गावात चक्क बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. विविध रंगांच्या सहाय्याने बैलाच्या अंगावर जरांगे पाटील यांचे चित्र काढण्यात आले. तसेय या बैलाची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.
गावातून मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा असलेली मिरवणूक निघाल्यावर सर्वांनीच कौतुक केले. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करून सरकारी यंत्रणा हलवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
धाराशिवमधील दहीफळ गावात अशा प्रकारे बैलाच्या अंगावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रंगाच्या साह्याने रेखाटन आली. तसेच गावातून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
'कोरडा दुष्काळ जाहिर करा', बैलपोळ्यानिमित्त बैलांवर मजकूर लिहून शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
दुष्काळ आणि लंपी रोगाच्या सावटातही शेतकरी आपल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना दिसताय. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान राहाता शहरात सार्वजनिक बैलपोळा साजरा होत असताना बळीराजाने आपल्या बैलावर 'कोरडा दुष्काळ जाहिर करा' अशा आशयाचा मजकूर लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.