बीड, ता. ८ सप्टेंबर २०२४
Dhananjay Munde Speech In Ganpati Festival: मी कृषिमंत्री म्हणून एक गोष्ट पाचवीला पुजलेली आहे, ती म्हणजे कायम शिव्या खाव्या लागतात. पण जर धनंजय मुंडे वाईट असेल तर त्याला शिव्या द्या, मात्र इथल्या आलेल्या कलाकारांना शिव्या देऊ नका, असे म्हणत परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ गणेश मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच सही वक्त पर करवा देंगे हदो का एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असणाऱ्या नाथ प्रतिष्ठान आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासह दिग्गज कलाकार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्याचबरोबर पुढील दहा दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमाची परळीकरांना मेजवानी असणार आहे. आणि यामुळं विरोधकांनी या गणेश महोत्सवाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंवर टीका केली होती. यावरुनच धनंजय मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
"अगोदरच मी कृषिमंत्री आहे. त्यामुळे कृषिमंत्री म्हटल्यानंतर त्या कृषीमंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे.. पाऊस जास्त झाला शिव्या कृषीमंत्र्याला खाव्या लागतात..पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात आणि अतिवृष्टी झाल्यानंतर उचक्या लागतात अन् आणि पोटही दुखंत. अरे हेच ते नाथ प्रतिष्ठान आहे, ज्या नाथ प्रतिष्ठानने गरीबातील गरीब शेतकऱ्यांच्या 2200 मुलींचे कन्यादान करण्याचे भाग्य हे नाथ प्रतिष्ठान म्हणून मला करण्याचे भाग्य मिळाले...कोरोनामध्ये या राशन पुरविले. कोविड झाल्यावर कोणी येत नव्हते तेव्हा नाश्ता, जेवण या नाथ प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी दिले," असे धनंजय मुंडे म्हणाले.
"आमच्या भगिनींनी कला जर श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवात दाखवली, तर त्याकरिता तुम्ही नाव ठेवू नका, जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिव्या द्यायचा, मात्र जर एक भगिनी आमची इथं कला दाखवत असेल, तर त्या आमच्या बहिणीला नाव ठेवायचा, शिव्या द्यायचा अधिकार तुम्हाला कोणीही दिला नाही ? हे आवर्जून आणि ठासून या ठिकाणी सांगतोय," असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंवरही निशाणा साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.