पाकिस्तान, ता. ८ सप्टेंबर २०२४
Pakistan Got Blue treasure: कर्जात बुडालेल्या आणि भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानला मोठी लॉटरी लागली आहे. पाकिस्तानच्या सागरी सीमेवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून समुद्राच्या तळाशी या खजिन्याचा शोध घेतला जात होता, अखेर तो आता सापडला असून आता देशाची आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
पाकिस्तानमधील डॉन न्यूज या वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सागरी सीमेवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. तेल आणि वायूचे साठे शोधण्यासाठी मित्र देशाच्या मदतीने समुद्रात तीन वर्षांचे सर्वेक्षण करण्यात आले. पाकिस्तानला जिओ सर्व्हेद्वारे या तेल साठ्याची माहिती मिळाली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी शाहबाज शरीफ सरकारला याबाबतची माहिती दिली. आता लवकरच तेथे तेल आणि वायू काढण्याचे काम सुरू केले जाऊ शकते. मात्र विहिरी खोदणे आणि प्रत्यक्षात तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या खजिन्यापासून 'ब्लू वॉटर इकॉनॉमी'चा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ही ‘ब्लू वॉटर इकॉनॉमी’ केवळ तेल आणि वायू पुरवत नाही; पाकिस्तानला समुद्रातून इतर अनेक मौल्यवान खनिजे मिळण्याची अपेक्षा आहे. यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती बदलू शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. इंधनाची आयात कमी होण्यास मदत होईल आणि परकीय चलनाच्या साठ्यात लाखो अमेरिकन डॉलर्सची बचत होईल.
दरम्यान, पाकिस्तानच्या मुरी पेट्रोलियमच्या वार्षिक अहवाल 2024 नुसार, कंपनी नुकत्याच बांधलेल्या पाइपलाइनद्वारे सिस्टीममध्ये शेवा-2 मधून 70 घनफूट गॅस जोडण्यासाठी सज्ज आहे. ही गॅस पाइपलाइन सुई नॉर्दर्न पाइपलाइन गॅस लिमिटेडने बांधली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रकल्पाला विलंब झाला होता, परंतु पाइपलाइन ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण झाली. ग्रीडमध्ये गॅस इंजेक्ट करण्याचे काम प्रारंभिक उत्पादन सुविधा सुरू झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या रॅम्प-अपनंतर सुरू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.