NCP: गणेश उत्सवानिमित्त राष्ट्रवादीनं शेअर केला ॲनिमेटेड व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रचार गीताचा बोलबाला

Ajit Pawar Group: अजित पवार गट विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. अजित पवार यांनी जनसंपर्क वाढवत जन सन्मान यात्रा सुरू केलीय.
NCP: गणेश उत्सवानिमित्त राष्ट्रवादीनं शेअर केला ॲनिमेटेड व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रचार गीताचा बोलबाला
Ajit Pawar Group
Published On

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट तयारीला लागलाय. जनतेशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा सुरू केलीय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचारासाठी, समर्थक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर नवनवीन तंत्राचा अवलंब करताना दिसत आहे.

अजित पवार आणि पक्षानं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या ॲनिमेटेड व्हिडिओत अनेक कल्याणकारी योजनांचा समावेश करण्यात आलाय. माझी लाडकी बहीण योजना, ज्या अंतर्गत महिलांना १५०० रुपये स्वावलंबन निधी दिला जात आहे. १ कोटी ६० लाख लाभार्थींना याचा हप्ता आधीच मिळाला आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत ५२ लाख कुटुंबांना मोफत सिलिंडर मिळत आहेत, त्याचे श्रेय गणपती बाप्पाला जाते, असं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीने काल “दादाचा वादा” या नवीन प्रचार गीताचा टीझर लाँच केला आहे. काही आठवड्यांपूर्वी, अजित पवार यांनी एक नवीन प्रचार गाणंही लाँच केलं होतं. 'काम करत आलोय, काम करत राहू'' हे शिर्षक असणाऱ्या या गाण्याचा व्हिडिओ लाँच झाल्यानंतर त्याला काही दिवसांतच सोशल मीडियावर ७५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

अजित पवारांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू हा केवळ शासनाच्या योजनांवरच राहिला आहे, मग तो त्यांचा राज्यव्यापी दौरा असो किंवा सोशल मीडियावरील पोस्ट. राजकारणान न करता अजित पवार आपली सर्व ताकद अधिकाधिक लोकांना योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी वापरत आहेत. कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाइन - ९८६१७१७१७१ ही अजित पवार यांनी यापूर्वी सुरू केली आहे.

नागरिकांना फोनही करण्याची गरज नाही, त्यांना मदत मिळवण्यासाठी फक्त व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. स्वयंचलित चॅटबॉट प्रणाली इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये लोकांना मार्गदर्शन करत आहे.

NCP: गणेश उत्सवानिमित्त राष्ट्रवादीनं शेअर केला ॲनिमेटेड व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रचार गीताचा बोलबाला
Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता याच महिलांचे अर्ज मंजूर होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com