Maratha Aarakshan : सरकारने आरक्षण दिलेय, पण खुर्चीसाठी काही..., मुंडेंचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Dhanjay Munde On Maratha Aarakshan : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, परंतु काही लोक खुर्चीसाठी आरक्षणाचा गैरवापर करतात, अशा शब्दात टीकेची झोड उडवली.
Dhanjay Munde On Manoj Jarange Patil In Beed
Dhanjay Munde On Manoj Jarange Patil In BeedSaam TV Marathi News
Published On

Dhanjay Munde On Manoj Jarange Patil In Beed : दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेय, पण काही लोक खुर्चीसाठी मराठा समाजाला झुलवत आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, आम्हाला काही अडचण नाही. पण याच्या ताटातलं काढून त्या ताटात नको, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलेय. दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी चौफेर टीका केली. आपल्यावरील आरोपांचे उत्तर दिलेच, त्याशिवाय मंत्रिबदाची खदखद बोलून दाखवली.

विद्यार्थी चळवळीत होतो तेव्हापासून ज्या ज्या आरक्षणाचा मुद्दा आला, त्या त्या वेळी मी त्या जातीसाठी लढणारा, भांडणारा कार्यकर्ता आहे. तुमच्यापासून हे लपलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले, आम्हाला आनंद आहे. त्या चळवळीतही आम्ही होतो. पण काही जण या आरक्षणाच्या आडून ओबीसीमधून आरक्षण घ्यायचेय असे म्हणतात. मराठा समाजाला EWS आरक्षण दिलेय.

आता एमपीएसचीचा रिझल्टमध्ये ओबीसीचा कटऑफ ४८५ होता आणि EWS चा कटऑफ ४५० होता. जर मी EWS मधून अर्ज भरला असता तर ४५० पास झालो असतो. पण ओबीसी प्रमाणपत्र घेऊन अर्ज भरला तर ४८० मध्येही नापास झालो असतो. काही लोक स्वत:ला खुर्ची मिळावी, यासाठी सर्व करत आहेत. मराठा समजासाठी सरकारने जे करायचे ते केले, आताही करतेय. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आणखी द्यावं.. आमचं काही म्हणणं नाही. पण याच्या ताटातलं काढून त्या ताटात नको. हे मी या मेळाव्याच्या निमित्ताने सांगतोय.

जाती पातीमुळे दोस्त दुष्मन झाले, हा द्वेष संपवा

आम्ही कुणाला विरोध केला नाही, अथवा कुणाच्या विरोधात नाही. हा अध्यात्माशी आणि शिक्षणाची जोडला गेलेला समाज आहे. आपल्या सगळ्यांना सुरूवात करावी लागेल, आज जे बीड जिल्ह्यात जाती पातीचे राजकारण सुरू आहे, ते संपवायला हवं. बीडमध्ये जातीपातीचे राजकारण वाढले, एकमेकांना न पाहणं.. जातीमुळे दोस्ती तुटली.. हे वातावरण आपल्याला मिळून बदलायची आहे. जाती-धर्मातील द्वेष संपवायचा आहे, हाच संदेश या दसरा मेळाव्याच्या निमित्तान देतोय.

Dhanjay Munde On Manoj Jarange Patil In Beed
Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

पंकजाचा आधार अन् मनातील खदखद -

मागील २५० दिवसात माझी वाईट अवस्था झाली होती. त्या कठीण काळात बहीण मला आधार देत होती. माझ्याविरोधात मिडिया ट्रायल चालवले जात होते, त्यावेळी बहिणीने खंबीर साध देत आधार दिला. महायुतीच्या नेत्यांनी, माझ्या पक्षानेही आधार दिला. माझ्या विरोधात जो घोटाळा काढला, तो कोर्टात गेला, कोर्टातून मला क्लीन चीट मिळाली. चुकीचं केल्यामुळे जे कोर्टात गेले, त्याला लाख रूपयांचा दंड झाला. पण इतके होऊनही मी शिक्षा भोगतोय.

अतिवृष्टीमध्येही मेळावा का? मुंडेंनी सांगितले कारण

बीडमध्ये प्रत्येक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. हा मेळावा घ्यायचा की नाही, असे मी पंकजाला म्हणालो. पण त्यांनी घेण्याचा निर्णय घेतला. कारण, ही परंपरा खंडीत होऊ द्यायची नाही, असे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बीडमधील प्रत्येक भागातील शेतकरी होरपळलाय. तरीही आज सर्वजण गडावर आले आहेत. आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. माझी बहीण मंत्रिमंडळात आहे. शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत, जास्तीत जास्त मदत पंकजा ताई महायुतीच्या मंत्रिमंडळाकडून मिळवून देणार, हा विश्वास व्यक्त करतो.

Dhanjay Munde On Manoj Jarange Patil In Beed
Pune : पुण्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई

भगवान भक्तिगडावर मोर्चा कधीपासून ?

दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा, घोषणा देणाऱ्यांना काहीही माहिती नाही. भगवान गडाचे उद्घाटन स्वर्गीय यशवंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दसऱ्याच्या दिवशी केले. तेव्हापासून या दसऱ्या मेळाव्याची परंपरा आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेहला. पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांचा मला अभिमान वाटतोय, साहेब गेल्यानंतरही ही परंपरा त्यांनी कायम ठेवली, अडचणी आल्या पण त्यांनी परंपरा मोडली नाही.

मागील दसरा मेळाव्याला स्टेजवर असणारे अनेकजण दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही, असे त्यांना वाटते. पण कुणी जर हा विचार घेऊन इथं असेल तर आलेल्या प्रत्येक जाती-पाती धर्मातील बाबांचा भक्त, मुंडे साहेबांचा अनुयायी, या सर्वांना संपवायला कुणी निघाला असेल तर त्याला दहा जन्म शक्य होणार नाही.

Dhanjay Munde On Manoj Jarange Patil In Beed
New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com