Maharashtra Politics: धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा सरकारने बडतर्फ करावे असे कोण म्हणाले?

Dhananjay Munde Must Resign: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
harhwardhan sapkal on mahayuti sarkar
harhwardhan sapkal on mahayuti sarkar saam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: महाराष्ट्र सरकारने महसुली तुटीच्या कारणास्तव आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील विकास कामांना स्थगिती दिली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महसुली तुटीची किंमत आता नागरिकांना चुकवावी लागत आहे. सरकार विकास कामांचा वेग मंदावत असून संविधानाच्या विरोधात काम करत आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने शाळा बंद केल्या जात आहेत आणि आरोग्य योजनांवर कात्री चालवली जात आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील निधी कपात हा निंदनीय निर्णय आहे, असे सपकाळ म्हणाले.

harhwardhan sapkal on mahayuti sarkar
Kalyan Politics : घोटाळे करून पैसे कमावणार, त्यातून राजकारण करणार; मनसेचा शिंदे गटावर तिखट वार

त्यांनी सरकारवर तिन्ही इंजिन मिळून महाराष्ट्राच्या मूलभूत हक्कांवर घाला घालत असल्याचा आरोप केला. मोदींकडे जर या सरकारची चलती असेल, तर त्यांनी दिल्ली गाठून महसुली तूट भरून काढावी. पण नागरिकांचे हक्क हिरावू नयेत. अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

harhwardhan sapkal on mahayuti sarkar
Maharashtra Politics : शरद पवारांच्या आमदाराचा अजितदादांसोबत एकाच गाडीने प्रवास; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा INSIDE स्टोरी

धनंजय मुंडेंनी तातडीने राजीनामा द्यावा

वाल्मीक कराड प्रकरणी धनंजय मुंडेंनी तातडीने राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

विरोधी पक्षनेता पदावर ठाकरे गटाचा दावा

विरोधी पक्षनेता पदावर ठाकरे गट दावा सांगणार असल्याच्या चर्चांबाबत सपकाळ म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढल्या. आमचे विधिमंडळातील सहकारी मित्रपक्षांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील.

हम दो, हमारे दो

पीएफवरील व्याज कपात हा कामगारांवर अन्याय असून उद्योगपतींना फायदा मिळवून देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. "हे सरकार 'हम दो, हमारे दो'च्या धोरणाने काम करत आहे अशी टीकाही त्यांनी केली.

वाहन नंबर प्लेट शुल्क – महाराष्ट्रात तिप्पट दर

वाहनांच्या नंबर प्लेट शुल्कासंदर्भात सरकारवर ताशेरे ओढताना सपकाळ म्हणाले, गोव्यात १५५ रुपये, गुजरातमध्ये १६० रुपये शुल्क असताना महाराष्ट्रात तिप्पट शुल्क आकारले जात आहे. हा नागरिकांच्या खिशावर अन्यायकारक आर्थिक भार आहे. सरकारचा हा 'झिझिया कर' आम्ही विधानसभेत उपस्थित केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com