Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंकडून लोकसभेची पूर्वतयारी? कोणत्या बुथवर किती मदतान पडेल हे सांगून टाकलं

Beed Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळा तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Dhananjay Munde Preparation for Lok Sabha Elections
Dhananjay Munde Preparation for Lok Sabha Electionssaam tv

Dhananjay Munde to contest Lok Sabha elections: सध्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे मतदारसंघासह बाहेरही अॅक्टिव्ह असल्याचे पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी पक्षाची लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल झाली आहे. यात बीडमधून धनंजय मुंडे यांचं देखील नाव आहे.

त्यामुळं आगामी बीड लोकसभा धनंजय मुंडे लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान आता खुद्द धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीविषयी मोठं विधान केलं आहे.

Dhananjay Munde Preparation for Lok Sabha Elections
Eknath Shinde On New Parliament: नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धनंजय मुंडे म्हणाले, मला आत्ता विचरलं तरी सांगतो लोकसभेचे जे बूथ आहेत त्यांची संख्या 16000 च्या घरात आहे. या 1600 बूथपैकी 500 ते 600 बूथचं गणित मी आपल्याला सांगतो. या सर्व बुथवर कुठल्या चिन्हाला किती मतं पडतील आणि त्या दोन चिन्हसोबत आणखी तिसरं चिन्ह घातल्यावर कोणतं चिन्ह पुढं जाईल? इथपर्यंत सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत असे धनंजय मुंडे म्हणाले. (Latest Political News)

Dhananjay Munde Preparation for Lok Sabha Elections
Viral Video: पाणीपुरी खायची असेल तर आधार कार्ड दाखवा! विक्रेत्याची अजब अट, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळा तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडेंकडून बीड जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळं आता धनंजय मुंडे लोकसभा निवडणूक लढवणार का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com