Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचा राजीनामा! मुंडेंच्या पीएने मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिला राजीनामा

Dhananjay Munde Resignation: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले.
Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचा राजीनामा! मुंडेंच्या पीएने मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिला राजीनामा
Published On

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. धनंजय मुंडेंचे पीए मुंडेंचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम दिला. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंवर आरोप होत होते. आज विधीमंडळ सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला.

Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचा राजीनामा! मुंडेंच्या पीएने मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिला राजीनामा
Sarpanch Santosh Deshmukh Case: बीड बंद! १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी',सरकारचा आदेश

स्वत: सागर बंगल्यावर ने येता त्यांनी आपल्या पीए प्रशांत जोशीद्वारे मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याची प्रतिक्रिया दिली होती. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काही वेळात मुंडे यांचे पीए प्रशांत जोग हे सागर बंगल्यावर येत मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा दिलाय.

Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचा राजीनामा! मुंडेंच्या पीएने मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिला राजीनामा
Dhananjay Munde: मुंडेंची घटीका जवळ आलीय, आता फक्त अजित पवारांनी...सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल आदी उपस्थित होते. धनंजय मुंडेदेखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. याच बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा रात्रीच लिहून घेतला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंडेंचा राजीनामा पीएकडून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत त्याबाबत घोषणा केली.

Dhananjay Munde:धनंजय मुंडेंचा राजीनामा! मुंडेंच्या पीएने मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिला राजीनामा
Devendra Fadnavis On Dhanjay Munde: मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

काय होते आरोप, काय आहे प्रकरण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते,असं सांगितलं जातं. राजकीय अभय असल्याने कराडने बीडमध्ये गुन्ह्यांबाबत कोणतीच कारवाई केली जात नव्हती, असे आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. सोमवारी सीआयडीच्या दोषारोपपत्रासोबत हत्येचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com