VIDEO: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, भक्त संपतापले; मंदिरातील चुकीच्या प्रथा कधी रोखणार?

Shri Tuljabhavani Temple: महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्यानं वाद निर्माण झालाय. पुजारी मंडळानंही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतलाय. चुकीच्या प्रथा पडत असल्यानं सर्वच स्तरावर नाराजी व्यक्त होतेय.
तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, भक्त संपतापले; मंदिरातील चुकीच्या प्रथा कधी रोखणार?
Shri Tuljabhavani TempleSaam Tv
Published On

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवी मंदीर संस्थान सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं वादाच्या भोव-यात आहे. नुकतंच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयातील 50 पेक्षा अधिक महत्वाच्या संचिकाच गायब झाल्याचं प्रकरण समोर आलंय. तर दुसरीकडे तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

आता एका ताज्या घटनेनं पुन्हा एकदा संस्थानचा भोंगळ कारभार चर्चेत आलाय. देवीला एका भाविकानं आणलेला चॉकलेटचा हार वादाचा मुद्दा ठरलाय. भाविकानं आणलेला हार देवीला घालण्याला या प्रकारावर पुजारी मंडळाने आक्षेप घेतलाय. या प्रकाराबद्दल त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच तक्रार केलीय.

तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, भक्त संपतापले; मंदिरातील चुकीच्या प्रथा कधी रोखणार?
VIDEO: नागरिकांच्या आरोग्याशी Kem हाॅस्पिटलचा खेळ, पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट; पाहा व्हिडिओ

देवीचा गाभारा हा ऐतिहासिक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील पावित्र्य राखलं गेलं पाहीजे. गेल्या काही वर्षात चुकीच्या प्रथा पडत असल्यानं भाविकांनीही नाराजी व्यक्त केलीय.

तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, भक्त संपतापले; मंदिरातील चुकीच्या प्रथा कधी रोखणार?
Richest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

भक्तानं दिलेला चॉकलेटचा हार पुजाऱ्याने मंदीर संस्थानच्या परवानगीने घातला होता. मात्र मंदिरासाठी देऊळ कवायत कायदा लागू असताना असे प्रकार होणं चुकीचं आहेत. नवनवीन प्रथा नकोच असा सूर सर्वच स्तरातून उमटतोय. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या तुळजापूर देवी मंदीर संस्थानचा कारभार कधी सुधारणार, त्यात पारदर्शकता कधी येणार हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com