Accident News : दिवाळीत शोककळा! यात्रेवरून येताना ९ भाविकांचा मृत्यू, 11 जणांची प्रकृती चिंताजनक

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यात वाहनाचा भीषण अपघात झाला. चांदशैली घाटात पिकअप गाडी १०० फुट खोल दरीत कोसळली. ९ जणांचा जागीच मृत्यू, तर २२ हून अधिक जखमी.
Accident News : दिवाळीत शोककळा! यात्रेवरून येताना ९ भाविकांचा मृत्यू, 11 जणांची प्रकृती चिंताजनक
Nandurbar Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • नंदुरबार जिल्ह्यात यात्रेहून परतणाऱ्या भाविकांची पिकअप उलटली

  • अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • २२ जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

  • गाडी १०० फुट खोल दरीत कोसळली असून बचावकार्य सुरू आहे

  • या अपघातामुळे सातपुडा परिसरात शोककळा पसरली आहे

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर दुर्दैवी घटना घडली आहे. नंदुरबार येथील धार्मिक यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. चांदशैली घाटात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. वाहन थेट घाटाच्या एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर गडगडत खाली गेली. हा अपघात इतका भयंकर होता की, ९ भाविकांचा मृत्यू झाला.

Accident News : दिवाळीत शोककळा! यात्रेवरून येताना ९ भाविकांचा मृत्यू, 11 जणांची प्रकृती चिंताजनक
Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

२२ हून अधिक गंभीर जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घाटातील तीव्र वळणावरून गाडी थेट १०० फिट खाली कोसळली.

Accident News : दिवाळीत शोककळा! यात्रेवरून येताना ९ भाविकांचा मृत्यू, 11 जणांची प्रकृती चिंताजनक
Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

त्यामुळे व्हॅनच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता असून ही यात्रा आदिवासी समुदायासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने, या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com