Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

Nagpur Accident News : नागपुरामध्ये चार वर्षीय मुलाचा स्कूलबसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. आईसमोरच घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात
Nagpur Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये स्कूलबसच्या धडकेत ४ वर्षीय पार्थचा मृत्यू

  • पार्थची बहीण शाळेत जात असताना घडला दुर्दैवी अपघात

  • आईसमोरच घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

  • बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे

नागपूर मधून धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार वर्षीय चिमुकल्याचा स्कुल बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सदर घटना ही कळमेश्‍वरमधील महाजन लेआउट परिसरात शुक्रवारी घडली आहे. पार्थ पंकज कांडलकर असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थची बहीण गार्गी सेंट जोसेफ स्कूल फेटरी येथे तिसऱ्या वर्गात शिकते. सकाळी नेहमीप्रमाणे पार्थच्या आईने गार्गीला घराजवळ उभ्या असलेल्या एमएच ४० सीटी ४३९० क्रमांकाच्या स्कूलबसकडे नेले. तेव्हाच पार्थ मागून धावत आला. चालकाचे त्याच्याकडे लक्ष नसल्याने बस सुरू करताच पार्थ बसच्या मागील चाकाखाली आला.

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात
TDR File Approval : महापालिकेची मोठी घोषणा! टीडीआर प्रक्रिया आता फक्त ९० दिवसात, 'या' तारखेपासून नियम लागू होणार

या दुर्घटनेत पार्थच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला ताबडतोब कळमेश्वर येथील पोतदार मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पार्थ एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. पार्थच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात
Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

घडलेल्या घटनेनंतर पार्थच्या कुटुंबीयांनी कळमेश्वर पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या स्कुल बस चालकाला कोणती शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूरच्या ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com