ओबीसींना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण हवं, जातनिहाय जनगणना करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. जालन्यातील वाडीगोद्रीत लक्ष्मण हाकेची भेट घेतल्यानतंर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली. या जनगणनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. ओबीसी समाजाच्या मागण्या मांडतांना भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना टोलाही मारला.
आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि आम्ही कोणालाही धमक्या घेत नाही, असं म्हणत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले. ओबीसी समाजाने एकत्र राहावे, आवाहनही भुजबळ यांनी केलं. यापुढे तुम्ही सगळे एकत्र राहिल्यात तर तुमचं आरक्षण टिकेल, असं भुजबळ म्हणालेत.
लक्ष्मण हाके यांना आंदोलन मागे घ्यावे ही विनंती करताना छगन भुजबळ यांनी राजकीय आरक्षणाची मागणी केली.विधानसभा आणि लोकसभेत ओबीसी समाजाला आरक्षण द्यावं,अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले,शुक्रवारी सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही तीन मागण्या केल्या. त्यातील एक मागणी म्हणजे देशात आणि राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यावेळी बैठकीत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातनिहाय जनगणनेला आमचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जातीनिहाय जनगणना केली. ते आता सरकारमध्ये आहेत,चंद्राबाबू नायडू हेदेखील सरकारमध्ये आहेत, त्यांचाही त्या जनगणनेला पाठिंबा आहे.विरोधीपक्षातील नेतेही जातीनिहाय जनगणना करावी,अशी मागणी करत आहेत. त्यामुळे राज्यात ही जनगणना झाली पाहिजे असं छगन भुजबळ म्हणालेत. पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले,२०१० मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रयत्न केला. २०१६ मध्ये जनगणना करण्यात आली. गावातील जनगणना ग्रामविकास विभागाने केली.
तर शहरातील जात गणना शहर विकास विभागाने केली. त्यानंतर आलेल्या अहवालात स्पष्ट झालं की, ओबीसी स्थिती खूप खराब आहे. हा समाज मागासवर्गीय आहे, गावागावात ते हलाकीचे जीवन जगत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं. परंतु त्यात ओबीसी समाजाचा आकडा जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळेच आम्ही आज मागणी केली की जाती जनगणना करा, आमची संख्या किती आहे, हा आकडा समोर येऊ द्या, असं छगन भुजबळ म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.