

महाराष्ट्रासह देशातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इंडिया आघाडी'वर वाकबाण सोडले.पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणं हा एकमेव कार्यक्रम विरोधकांचा आहे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. यांच्यामागे एक शक्ती आहे. त्यांना अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैशांवर हे लोक अराजकता माजवत आहेत, असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला. (Latest Marathi News)
मुंबईत आयोजित सभेत फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आपली भूमिका मांडली तसेच आरक्षण मिळवूनही दिले, टिकवूनही ठेवण्यात आले. आमचं सरकार होतं तोपर्यंत सुप्रिम कोर्टात आरक्षणार स्थगिती आली नाही. मात्र मविआचे सरकार आले आणि आरक्षण गेले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
राज्यात आगामी लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. इंडिया आघाडीतील सर्व नेते बैठका आणि सभा घेत आहेत. यावरून फडणवीसांनी निशाणा साधत म्हटलं की, "मोदींचं भाषण ऐकायला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व्यक्ती येतात. मात्र ममता बॅनर्जी, शरद पवार याचं उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळमध्ये भाषण ठेवलं तर कोण येणारे बघायला?" असा खोचक सवाल फडणवीसांनी विचारला आहे.
आपली जबाबदारी आहे. आपली कामे आपल्याला प्रमाणिकपणाने करायची आहेत. ज्याला जी पदे देण्यात आलीत त्यानुसार काम करणे गरजेचं आहे. पद फक्त प्रतिष्ठेसाठी नाही तर आपली जबाबदारी समजून काम केले पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.