Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Ministers Caught: वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याने आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेत तंबी दिलीय... फडणवीसांनी मंत्र्यांना नेमकी काय तंबी दिलीय?
Devendra Fadnavis warns ministers during a tense cabinet meeting amid growing controversies and viral video scandals
Devendra Fadnavis warns ministers during a tense cabinet meeting amid growing controversies and viral video scandalsSaam Tv
Published On

महायुती सरकारला वर्षही पूर्ण झालं नाही... मात्र मंत्र्यांच्या वादाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही...त्यातच रमी खेळतानाच्या व्हिडीओ प्रकरणी कोकाटेंची गच्छंती होणार असल्याची चर्चा होती.. मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी फक्त कानउघडणी करुन कोकाटेंना अभय दिल्याची माहिती समोर आलीय..

अजितपवारांकडून कानउघडणी, कोकाटेंचं मंत्रिपद राहणार?

अजित पवार- मीडियाशी बोलताना भान ठेवा

सहसा मीडियाशी बोलणं टाळा

माणिकराव कोकाटे- होय दादा

अजित पवार- तुमच्या एका शब्दाने पक्षाची प्रतिमा मलिन होतेय

माणिकराव कोकाटे- यापुढे अशी चूक होणार नाही, याची काळजी घेईन

अजित पवार- कोणी चुकलं तर माझ्याकडे यायचं नाही, तिथून मागे फिरायचं

तर अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 20 मिनिटं सर्वच वादग्रस्त मंत्र्यांची शाळा घेतली आणि तंबी दिलीय...

वाचाळवीर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी

मुख्यमंत्र्यांकडून वाचाळ मंत्र्यांचा 20 मिनिटं शाळा

वादग्रस्त विधानं, कृती खपवून घेणार नाही

वाचाळ मंत्र्यांमुळे सरकारची बदनामी

वाचाळवीर मंत्र्यांना आता शेवटची संधी

काय कारवाई करायची ती करू

यापुढे एकही प्रकार खपवून घेणार नाही

वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी कऱण्याऐवजी अभय दिल्याने या मंत्र्यांवर गोमुत्र शिंपडून पवित्र करुन घ्या, असा खोचक टोला विरोधकांनी लगावलाय...

सध्या तरी वादग्रस्त मंत्र्यांना अभय मिळालं असलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसण्याची चाचपणी करुन योग्यवेळ येताच या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यताच अधिक आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com