Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला आनंद झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जळगावातील जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, उदयराजे भोसले, शिवेंद्र राजे भोसले उपस्थित होते. अनावरण सोहळ्याआधी जामनेरमध्ये रॅलीच्या माध्यमातून भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती साधारणतः १६ फुट उंचीचा ब्रांझ धातुचा पुतळा व सिहासन ३२ फुट आहे
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या नगारखानासहित वाड्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकार केली आहे.
या मराठामोळ्या शैलीच्या वाड्याची लांबी १०० फूट आहे आणि यात तळ मजल्यावर १२ खांब आणि पहिल्या मजल्यावर २४ खांब आहेत. वाड्याच्या बाजूच्या भिंतीची लांबी ५० फूट असून उंची वाड्याची तटबंदी धरून साधारण ३८ फूट आहे.
गिरीश भाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही, साधना महाजन यांना तिकीट देणार असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा साधना महाजन यांना जास्त मतं मिळणार, असेही फडणवीस म्हणाले. जामनेर येथे आयोजित शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळा प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. मात्र 2029 मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात मात्र ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्या पेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन ह्याच घेवू शकतात, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जामनेर मध्ये आयोजित शिवसृष्टी व भिमसृष्टी स्मारकाच्या अनावरण प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.