VIDEO: पंकजा मुंडेंसाठी फडणवीसांची शिफारस, पंकजांना राज्यसभेवर पाठवणार?

Pankaja Munde News: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महाराष्ट्र भाजपनं तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याचीही माहिती आहे. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना विनंती केल्याचीही माहिती आहे.
पंकजा मुंडेंसाठी फडणवीसांची शिफारस, पंकजांना राज्यसभेवर पाठवणार?
Pankaja Munde and Devendra FadnavisSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या आणि ओबीसींचा मराठवाड्यातला चेहरा पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या नावाची केंद्राला शिफारस केली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे मंत्री होत्या. कथित चिक्की घोटळ्यात पंकजांना चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. मात्र त्यावेळी फडणवीसांनीच त्यांना क्लीनचिट दिली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंनी अनेकदा सरकारला आणि भाजपला अडचणीत आणणारी वक्तव्य करत नाराज असल्याचे संकेत दिले.

पंकजा मुंडेंसाठी फडणवीसांची शिफारस, पंकजांना राज्यसभेवर पाठवणार?
VIDEO: 'आज मौका देख के कडू को चौका मारेंगे', कोण उठलं आमदार बच्चू कडूंच्या जीवावर?

कधीकाळी तर पंकजा भाजप सोडण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 2019 मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पंकजांची वर्णी लागली नाही. 2024च्या लोकसभेत प्रितम मुंडेंचं तिकीट कापून थेट पंकजांना मैदानात उतरवलं. मात्र त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा पंकजांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडेंना राज्यसभा का दिली जाऊ शकते त्याची काय कारणं आहेत, हे जाणून घेऊ...

पंकजांना राज्यसभा?

पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा मोठा चेहरा आहेत. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. विधानसभेसाठी सामाजिक बांधणीचा भाजपचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रात वाचा फोडण्यासाठी तरुण नेत्याची गरज. आणि त्यामुळेच नाराज झालेल्या सामाजिक घटकांना परत भाजपच्या व्होटबँकशी जोडण्यासाठी त्यांचं पुनर्वसन गरजेचं असल्याचं बोललं जातंय.

पंकजा मुंडेंसाठी फडणवीसांची शिफारस, पंकजांना राज्यसभेवर पाठवणार?
VIDEO: 'आज मौका देख के कडू को चौका मारेंगे', कोण उठलं आमदार बच्चू कडूंच्या जीवावर?

पंकजा मुंडेंचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ हा परळी आहे. मात्र याठिकाणी गेल्यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजांचा पराभव केला होता. त्यामुळे महायुतीत या जागेवर धनंजय मुंडेचा दावा आहे. पंकजा मुंडेंसाठी दुसरा विधानसभा मतदारंसघ शोधण्यापेक्षा त्यांची राज्यसभेवर वर्णी लावणं भाजपला जास्त सोयीस्कर आहे. त्यामुळेच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com