Beed: ४ महिन्यांच्या लेकीला बुडवलं अन् वडिलांनी आयुष्याचा दोर कापला, घरगुती कारण की आणखी काय? गूढ वाढलं

Beed Infant and Fathers Death: बीडच्या रामनगरमध्ये ३० वर्षीय अमोलने चार महिन्यांच्या बाळाला संपवलं. नंतर स्वत: आयुष्याचा दोर कापला. कारण अस्पष्ट.
Beed Infant and Fathers Death
Beed Infant and Fathers DeathSaam
Published On
Summary
  • वडिलांनी आधी ४ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं.

  • नंतर स्वत: आयुष्याचा दोर कापला.

  • मृ्त्यूचं गूढ वाढलं.

बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दसऱ्याच्या मंगलमय दिवशी घराघरात आनंद आणि उत्साह असताना सोनवणे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आधी वडिलांनी आपल्या चार महिन्यांच्या गोंडल बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवलं. नंतर स्वत: गळ्यात फास लावून आयुष्य संपवलं. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अमोल हौसराव सोनवणे (वय वर्ष ३०) असे निर्दयी वडिलांचं नाव आहे. चार दिवसांपूर्वी अमोल आणि त्याची पत्नी पायल यांच्यात घरगुती वाद झाला होता. रागाच्या भरात दोघांनी विषारी औषध प्राशन केलं. उपचारानंतर दि. २ ऑक्टोबर रोजी दोघे घरी परतले. पण दुसऱ्याच दिवशी पहाटे अमोलने टोकाचे पाऊल उचलले.

Beed Infant and Fathers Death
२ नातवंडांच्या आजीला म्हातारचळ; बॉयफ्रेंडच्या प्रेमात सैराट, सुनांचे दागिने घेऊन फरार

नेमके कोणत्या कारणातून हे घडले, याचा तपास सुरू असून अद्याप कारण समोर आलेले नाही. चार महिन्याच्या निष्पाप बाळाला पाण्यात टाकताना ते बाळ कोणत्या वेदना सहन करत असेल, याचा विचार जरी केला तरी हृदय पिळवटून जाते. आई पायल हिच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत आहेत. घरात उसळलेला रडण्याचा हुंदका संपूर्ण गावभर पोहोचला. कुणाच्याही डोळ्यात पाणी न येता राहिले नाही.

Beed Infant and Fathers Death
'चंद्रग्रहणाच्या रात्री १२ वाजता, कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा का कापला?' रामदास कदमांचा नवा आरोप

घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस स्टेशनचे स.पो.नि मनोज निलंगेकर, उपनिरीक्षक कैलास अनालदास, पो.ह शेख मोहसीन, पो.ह नारायण काकडे आणि चालक पो. पवन शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अमोल आणि त्याच्या बाळाचे शवविच्छेदन तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने तलवाडा परिसर शोकाकुल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com