'चंद्रग्रहणाच्या रात्री १२ वाजता, कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा का कापला?' रामदास कदमांचा नवा आरोप

Shiv Sena Shinde Leader Ramdas Kadam: रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे अन् अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता असा दावा त्यांनी केला.
Ramdas Kadam
Ramdas KadamSaam TV Marathi News
Published On
Summary
  • रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप.

  • अनिल परबांवरही घणाघात.

  • नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरेंचा २ दिवस मृतदेह मातोश्रीवरच होता, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. तसेच त्यांच्या हाताचे ठसेही घेण्यात आले, असं कदम म्हणाले. यानंतर खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कदमांच्या बायकोबाबत खुलासा करत ओपन चॅलेंज दिलं आहे.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. 'अनिल परब अर्धवट वकील असावेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अज्ञाताचं प्रदर्शन केलं आहे', असा घणाघात कदम यांनी परब यांच्यावर केला. 'या प्रकरणाबाबत सीबीआय़नं चौकशी करावी, यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार', असं रामदास कदम म्हणाले.

Ramdas Kadam
शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची सुई कुणाकडे?

'कुठल्या बाकड्यावर झोपलो होतो, हा प्रश्न विचारणारा तू कोण? आम्ही बाहेर पडलो म्हणून तुम्ही तिथे आहात', असं कदम म्हणाले. 'चंद्र ग्रहणाच्या रात्री १२ वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा का कापला?', असा नवा सवालही रामदास कदमांनी उपस्थितीत केला. त्यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ramdas Kadam
शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची सुई कुणाकडे?

अनिल परब यांनी रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की जाळलं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. तसेच नार्को टेस्ट करून चौकशी झाली पाहिजे, असं परब म्हणाले होते. परबांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नावर रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे. 'नार्को टेस्ट करण्यासाठी माझी उद्याही तयारी आहे. सिद्ध झाले नाही तर, काय शिक्षा द्यायची सांगा?', असं कदम म्हणाले. 'स्टोव्हवर स्वंयपाक करताना बायको आगीत भाजली. तिला मी वाचवण्याचा प्रयत्न केला', असं कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com