
अजित पवारांच्या कुटुंबात आता लवकरच सनई चौघडे वाजणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार(Jay Pawar Marriage) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याबाबत जय पवारांची आत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संकेत दिले आहेत. त्यांनी सोशल मिडिया पोस्ट शेअर करत जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचे अभिनंदन केले आहे.
सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीचे फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता अजित पवारांच्या कुटुंबात लवकरच मंगलकार्य होणार आहे. यामुळे संपूर्ण पवार कुटुंब लवकरच एकत्र येईल.
दरम्यान, काल जय पवार त्यांच्या भावी पत्नीसह शरद पवारांच्या भेटीला आले होते. यावेळी कुटुंबाच्या भेटीगाठी झाल्या. या कौंटुबिक कार्यक्रमाचे फोटो सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
कोण आहे जय पवारांची होणारी बायको? (Who Is Jay Pawar Wife)
जय पवार यांच्या बायकोचं नाव ऋतुजा पाटील असं आहे. या दोघांचा साखरपुडा १० एप्रिलला होणार आहे. साखरपुड्याचे निमंत्रण भावी वधू वरांनी शरद पवारांनी दिले आहे. ऋतुजा पाटील या मूळच्या फलटणच्या आहेत. फलटणचे प्रवीण पाटील यांच्या त्या कन्या आहेत. हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत.
सुप्रिया सुळेंची पोस्ट
सुप्रिया सुळेंनी कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. त्यात जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नी ऋतुजा यादेखील दिसत आहे. तसेच पवार कुटुंबातील सर्व महिलांनी या दोघांचे औक्षणदेखील केले आहे.या दोघांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.संपूर्ण कुटुंबासोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.