
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील मोर्चातल्या वक्तव्यांची चर्चा होत आहे. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालं. मात्र या चर्चांवर पाटलांनी तातडीने सफाईदारपणे स्पष्टीकरण दिलंय. हे प्रकरण जयंत पाटलांच्या स्पष्टीकरणानंतरही थांबलं नाही.. त्यात आता हसन मुश्रीफांनी पाटलांच्या नाराजीचं गुपित फोडलंय. तर काँग्रेसनेही पाटलांच्या नाराजीच्या चर्चांना दुजोरा दिलाय.
लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगलीय.. मात्र त्याची कारणं काय आहेत? पाहूयात...
जयंत पाटील भाजपात जाणार?
- राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरुन असलेला सुप्त संघर्ष
- साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत
- विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य
- मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य
- मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं 1 रिक्त मंत्रिपद
नेमकी जयंत पाटलांची हिच नाराजी हेरुन अजित पवारांनीही सभागृहातच साद घातली होती. त्यावेळी जयंत पाटलांनी योग्य वेळेचा दाखला देत सूचक संकेत दिले. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांची भाजपशी जवळीक वाढल्याचं चित्र आहे.
जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली होती. तर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे ऑफर दिलीय. पक्षांतर्गत कोंडी आणि खुणावत असेललं 1 रिक्त मंत्रिपद. त्यामुळे जयंत पाटील पवारांची साथ सोडणार की पक्षनिष्ठा कायम ठेवत पवारांना साथ देणार? याकडे लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.