Dengue in Kolhapur: कोल्हापूरचं टेन्शन वाढलं! ३०० हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यू, प्रत्येक घरात २ ते ३ रुग्ण

Dengue outbreak in Kolhapur district: कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. एका गावात तर प्रत्येक घरातील २ ते ३ जणाला डेंग्यूची लागण झालीय.
Kolhapur Dengue: कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; ३०० हून अधिक ग्रामस्थांना लागण, प्रत्येक घरात २ ते ३ जण बाधित
Dengue outbreak in Kolhapur districtYandex
Published On

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी गावात डेंग्यूचा कहर माजवलाय. जवळपास ३०० हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झालीय. प्रत्येक घरात २ ते ३ जण बाधित असल्याची माहिती रुग्णालयातून मिळालीय. हणमंतवाडी परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारासाठी ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी झालीय. मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय.

दरम्यान कोल्हापूरातील सरनोबतवाडी, मणेरमाळ, उंचगावमध्ये एका ११ वर्षाच्या मुलाचा बळी डेंग्यूमुळे गेलाय. जोरेज एजाज तकीलदार असे या मुलाचं नाव आहे. कोल्हापुरातील साई स्पर्श हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्याची डेंग्यूशी झुंज अपयश ठरली. जोरेज चौथीच्या वर्गात शिकत होता. डेंग्यूच्या आजारानं लहान वयात त्याचा मृत्यू झाल्यानं आरोग्य विभागाच्या उपाय योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. तसंच सरनोबतवाडी, उंचगाव परिसरात औषध फवारणी आणि आरोग्याच्या संबंधित कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.

Kolhapur Dengue: कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; ३०० हून अधिक ग्रामस्थांना लागण, प्रत्येक घरात २ ते ३ जण बाधित
Dengue Patient: यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचे २१ हजार रुग्ण; राज्याची राजधानी मुंबई आहे अव्वलस्थानी

एक आठवड्याआधीही डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मे आणि जूनच्या २० तारखे दरम्यान डेंग्यूचे ११६ रूग्ण आढळून आले होते. मे महिन्यात ग्रामीण भागात ३७ आणि शहरी भागात १२ असे ४९ रूग्ण आढळून आले होते. तर १९ जूनपर्यंत ग्रामीण भागात ५० आणि शहरी भागात १७ असे एकूण ६७ रूग्ण आढळले असल्याचे वृत्त लोकमत या वृत्त संस्थेने दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com