Today Marathi News : अनुस्कुरा घाटात कोसळली दरड, रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवली

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (13 june 2024) : मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन, राजकीय घडामोडी, पावसाच्या अपडेट, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv
Published On

Landslide In  Anuskura Ghat : अनुस्कुरा घाटात कोसळली दरड, रत्नागिरी - कोल्हापूर  मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवली

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील कोल्हापूर, मलकापूर,कराड या मार्गाला जोडणाऱ्या पाचल येथील अनुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कोल्हापूर मलकापूर कराड या मार्गावर जाणाऱ्या वाहतुकीला अन्यत्र वळविण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला पावसाने झोडपले

खटाव तालुक्यातील डाळमोडी घाडगे वस्ती परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने परिसरातील शेतामध्ये पाणी साठलं आहे. तर शेत जमिनीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून खटाव तालुक्यामध्ये व दुष्काळीपट्ट्यात मुसळधार पाऊस होत आहे.

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार

लोकसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 18 व्या लोकसभेला नवा अध्यक्ष मिळणार

लोकसभा अध्यक्षपदाची संधी भाजप महिला सदस्यला देण्याची शक्यता

आंध्र प्रदेशच्या भाजप खासदार डी. पुरंदेश्वरी यांचं नाव अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत

मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार:  उदय सामंत

मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.

महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार.

उदय सामंत यांनी टिव्ट करत दिली माहिती.

पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरण, अर्चना पूट्टेवार यांना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात आज कोर्टात पेश केलेल्या अर्चना पूट्टेवार यांना न्यायालयाने सुनावली 15 जून पर्यंत पोलीस कोठडी

काल न्यायालयाने यातील इतर आरोपी प्रशांत पार्लेवार, सचिन धार्मिक, सार्थक बागडे, नीरज निमजे आणि पायल नागेश्वर या पाच ही आरोपींना कोर्टाने 15 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

उद्या पोलीस सर्व आरोपींचा आमोरा समोर बसवून चौकशी करणार, उद्याच्या चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता...

फेअरप्ले ॲप प्रकरणी मुंबई आणि पुण्यात १९ ठिकाणी ईडीची धाड

फेअरप्ले ॲप प्रकरणी ईडीच धाडसत्र

मुंबई आणि पुण्यात एकूण १९ ठिकाणी ईडीच धाडसत्र

आयपीएल सामन्यांचे अनधिकृत प्रक्षेपण आणि बेटिंग प्रकरणी ईडीची कारवाई

लोकसभेच्या निकालांवर देखील सट्टेबाजी केल्याचा ईडीचा दावा

एकूण ८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त अथवा गोठवल्याचा ईडीचा दावा

धाडसत्रात रोकड, महागडी घड्याळे, बँक आणि डिमॅट खात्यांची माहिती तसेच गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचा ईडीचा दावा

Ravindra Waikar : खासदार रवींद्र वायकर यांनी घेतली एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची भेट

लोकसभ निवडणुकीतील विजयानंतर रवींद्र वायकर यांनी आज  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची भेट घेतली प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाउंडेशन कार्यालयात जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे.

Pune Accident : पुण्यातील चांदणी चौकात बसवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात , दोघांच मृत्यू

पुणे शहरातील चांदणी चौकात अपघात बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला असून ४ जण जखमी झाले होते. जखमींमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चांदणी चौकातुन कोथरुकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे.

Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवार उद्या पुणे दौऱ्यावर, विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

शहरातील विविध मुद्द्यांवर अजित पवार यांच्या उद्या अनेक बैठका होण्याची शक्यता

उद्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जल्लोष होण्याची शक्यता

Rohit Pawar : ब्रम्हदेव आले तरी त्यांच्या पक्षात फूट पडणार, १८-१९ आमदार संपर्कात, रोहित पवार यांचा दावा

माझी काकी म्हणून अभिनंदन

अजित दादा माझ्याबद्दल नौटंकी बोलले होते

अजित दादा यांनी स्वीकारलं आहे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत

आता ब्रम्हदेव असले तरी आता त्यांच्या पक्षात फूट पडणार आहे

निवडणूक लढत असताना जी यंत्रणा होती ती पक्षाची होती भाजपा बरोबर गेल्याने त्यांना नाकारलं

 Pune Accident : पुण्यातील चांदणी चौकात बसवरील नियंत्रण सुटून अपघात, ४ जण जखमी

पुणे शहरातील चांदणी चौकात अपघात बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. चांदणी चौकातुन कोथरुकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे.

PMO : पीके मिश्रा यांची PM नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पुन्हा नियुक्ती

निवृत्त आयएएस अधिकारी पीके मिश्रा यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयात त्यांची नियुक्ती असणार आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाणार आहे.

Rajya Sabha Election 2024 : सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्वानुमते : अनिल पाटील 

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय कलेक्टिव आहे.

कोणी एकांनी निर्णय घेतला नाही. पक्षात कोणीही नाराज नाही.

सर्व नेत्यांनी आग्रह धरला आणि अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाग पाडलं.

Manoj Jarange Patil : उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगें उपचारासाठी गलॅक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल

मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडल्यानंतर थेट संभाजीनगरच्या गलॅक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत. गेले ७ दिवस ते उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती.

OBC Reservation : आंतरवाली सराटीच्या वेशीवरच OBC समाजाचं आमरण उपोषण सुरू

आंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसीचे आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे आजपासून आमरण उपोषण करताय.. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण सुरू असून, जोपर्यंत राज्यपालाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं.

Hit and Run Case : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा हिट अँड रन प्रकरण, २४ तास उलटूनही गुन्हा दाखल नाही

पिंपरी चिंचवड पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा उघड,हिट अँड रन प्रकरणात 24 तास उलटल्यानंतर ही गुन्हा दाखल नाही

भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर एका कारणे महिलेला उडवून अपघात केल्याची घटना समोर

या अपघाताची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद

कल्याणमध्ये कोसळलं भलं मोठं चिंचेचं झाड, शेडचं नुकसान

कल्याणमध्ये पावसामुळे चिंचेचे भलं मोठं झाड उन्मळून पडलं

कल्याण आधारवाडी परिसरात घडली घटना

घराशेजारी झाड कोसळले... एका शेडचे नुकसान

सुदैवाने जीवितहानी नाही , अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचे काम सुरू

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाची जोरदार बँटींग

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने दुपारपासून जोरदार बँटींग सुरू केली असून, या शहरात जवळील ग्रामीण भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे गारवा निर्माण झाला असून, ग्रामीण भागातील शेतकरी या पावसाने सुखावला आहे. सकाळपासून ढगांचा गडगडात आणि ढगाळ वातावरण परिसरात होतं आणि दुपारनंतर परिसरात जोरदार पाऊस सुरू झालाय.

Raj Thackeray : राज ठाकरे यांची २०२८ पर्यंत मनसेच्या अध्यक्षपदी निवड

मनसेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची २०२८ पर्यंत अध्यक्ष म्हणून नियुक्ती एक मताने करण्यात आली. अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Lok Sabha Election : वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ, ठाकरे गटाचा आरोप

वायव्य मुंबई मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ

ठाकरे गटाचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाप्रमाणे हिंदू समाज पक्ष आणि भारत जन आधार पक्षाच्या उमेदवारांनी देखील केली सीसीटीव्ही फुटेजची मागणी

अमोल कीर्तीकर यांनी केली निवडणूक आयोगाला पत्राद्वारे तक्रार

निवडणूक आयोगाचे उत्तर आल्यावर कीर्तिकर न्यायालयात जाणार

Maratha Reservation: सगेसोयरेबाबतचा निर्णय एक महिन्यात घेऊ: शंभूराज देसाई

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आणि सगेसोयरे बाबतचा निर्णय घेण्यासंदर्भात मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. आज शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे-पाटील यांची मागणी एका महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन देसाई यांनी दिलंय.

MLA Resignation:  विधानसभेतील दोन आमदारांनी दिलेत राजीनामे, आणखी ४ आमदार देणार राजीनामा

विधानसभेतील दोन आमदारांनी राजीनामे दिलेत. आणखी ४ आमदार राजीनामा देणार आहेत.

खासदार झाल्याने संबंधित आमदारांना २० जूनपर्यंत राजीनामा द्यावा लागणार आहे.

आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.

अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिला नाहीये.

Sangli News : सांगलीत कार्यक्रमात आमरस खाल्याने १५ जणांना विषबाधा

सांगलीच्या जत तालुक्यातील अंकले येथे 15 जणांना विषबाधा झाली आहे. गावातील एका कुटुंबात आयोजित कार्यक्रमा दरम्यान आमरस खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुवासिनीच्या कार्यक्रमा निमित्ताने आयोजित जेवणाचा कार्यक्रम दरम्यान विषबाधा झाली. विषबाधा झालेले सर्व एकच कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरु आहेत.

Nagpur News : नागपुरातील चामुंडा बारुद कंपनीत भीषण स्फोट

चामुंडा बारुद कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नागपूरच्या धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटना स्थळावर जाण्यासाठी निघाल्याची माहिती हाती आली आहे.

मृतक आणि जखमी बद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Dombivli News : डोंबिवली ब्लास्ट प्रकरणानंतर केमिकल कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू

अमुदान कंपनी ब्लास्ट नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घातक केमिकल कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सुमारे साडेसातशे कंपन्यांचे सर्वेक्षण होणार आहे. आतापर्यंत 33 कंपन्यांना क्लोजर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तर आठ कंपन्यांना वॉलियनटरी क्लोजर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Sunetra Pawar News : सूनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

सूनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सूनेत्रा पवार यांनी विधानभवानात राज्यसभेचा अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार यांच्यासहित इतर नेते उपस्थित होते.

Sunetra Pawar : सूनेत्रा पवार राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात

सूनेत्रा पवार राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात पोहोचल्या आहेत. यासाठी अजित पवार देखील पोहोचले आहेत.

Raj Thackeray : मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार?

मनसे पुन्हा ' एकला चलो रे..' या भूमिकेत असण्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेसाठी मनसे २५० जागांची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे.

मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळाची इच्छा सांगितली.

Sunetra Pawar : सूनेत्रा पवार राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी रवाना

सूनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झाल्या आहेत. तसेच त्यांना राज्यसभा खासदार झाल्यानंतर मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणा लागू करा, खासदार डॉ.कल्याण काळेंची राज्यपालाकडे पत्राद्वारे मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण लागू करावं, अशी मागणी जालन्याचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे यांनी राज्यपालांकडे एका पत्राद्वारे मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचे या पत्रात म्हटलंय आहे.

Jalna Breaking: मनोज जरांगेंना पाठींबा देण्यासाठी जालन्यात मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन

मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी जालना - भोकरदन रोडवरील नांजा पाटीजवळ मराठा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शासनाने सगेसोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय.. सरकार मनोज जरांगे यांची परीक्षा बघते का? सरकारला जरांगे यांचा जीव घ्यायचा आहे का? असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.

Neet Exam : नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करणे योग्य नाही - सुप्रीम कोर्ट

नीट परीक्षा प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टात समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. 1563 विद्यार्थ्यांसाठी 23 जून रोजी पुनर्परीक्षा होणार आहे, अशी माहिती NTA ने कोर्टात दिली. पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटलं.

Maratha Reservation : लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, आंदोलकांनी महामार्ग अडवला

Summary

लातूर बीड महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.

यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ पुन्हा नाराज

मंत्री छगन भुजबळ पुन्हा नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानं भुजबळ नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने छगन भुजबळ यांच्या नाराजीचा सूर कमी आहे. मात्र, तरीही नाराजी कायम असल्याचं सांगण्यात येत आहे.

Pune News : पुण्यातून लोकसभेत भाजपचा विजय झाल्यानंतर मनसे नाराज

पुण्यातून लोकसभेत भाजपचा विजय झाल्यानंतर मनसे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. विजयाचे श्रेय एकटं भाजप घेत असल्याने मनसे नाराज असल्याचे सांगण्यात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात लीड मिळाल्याचा दावा मनसेचा आहे. तर भाजपचे हेमंत रासने हेच सगळं श्रेय घेत असल्याने मनसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. या श्रेयावरून कसब्याचे मनसे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी भाजपवर टीका केली.

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ट्रेन उशिराने

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडूप आणि विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.

Sunetra Pawar :  सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार?

सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार या आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pema Khandu : पेमा खांडू अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत.

काल पेमा खांडूंची अरुणाचल प्रदेश भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पेमा खांडू यांच्यासह काही मंत्रीही शपथ घेणार आहेत

Manoj Jarange Patil : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटणार

सरकारचं शिष्टमंडळ आज दुपारी आंतरवाली सराटीत येणार आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांचं शिष्ट मंडळ आंतरवाली सराटीमध्ये येणार आहे.

आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाचा सहावा दिवस आहे.

उपोषण सोडावं, या संदर्भात शिष्टमंडळ जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर मुंबई हायकोर्टात एकत्र सुनावणी

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर मुंबई हायकोर्टात एकत्र सुनावणी होणार आहे.मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे सुनावणी होणार आहे. १० टक्के मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका डॉ जयश्री पाटील यांनी दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com