
Delhi Shirdi Flight Air Hostess Molested : दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात (फ्लाइट क्रमांक 6A 6403) एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना २ मे रोजी दुपारी १:४० ते ४:१० या वेळेत घडली. शिर्डी विमानतळावर विमान उतरल्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी राहाता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी प्रवासी लष्करी जवान असल्याचे तपासात उघड झाले. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
राहाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एअर होस्टेस ही मूळची केरळमधील कोचीन येथील आहे. आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. गालड, चुरू, राजस्थान) याने प्रवासादरम्यान एअर होस्टेसला दोनदा जाणीवपूर्वक स्पर्श केला. एअरहोस्टेसबत तरूणाने असभ्या वर्तन केले. पीडितेने याबाबत लेखी तक्रार नोंदवली आहे. इंडिगोचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे यांनी फिर्याद दाखल केली. संदीप सिंग याच्याविरोधात भादंवि ३५४ (विनयभंग) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पेटारे करत आहेत. घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अशा घटना रोखण्यासाठी विमान कंपन्यांनी कठोर नियम आणि सुरक्षाव्यवस्था लागू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. या घटनेने शिर्डीमध्ये संतापाची लाट पसरली असून, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.