Crime : प्रेम केलं इतकाच तिचा गुन्हा; निर्दयी बापाने लेकीचा गळा दाबला, तुकडे करून भट्टीत जाळले

Father Kills Daughter : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये प्रेमविवाह केल्यामुळे एका बापाने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. डीजे पार्टीमध्ये तुकडे करून भट्टीत जाळले. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
Crime : प्रेम केलं इतकाच तिचा गुन्हा; निर्दयी बापाने लेकीचा गळा दाबला, तुकडे करून भट्टीत जाळले
Crime NewsSaam tv
Published On

Muzaffarpur honor killing : मुलीने गावातील एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केले, हे समजताच बापामधील राक्षस जागा झाला. नगरसेवक बापाने मुलगी घरी आल्यामुळे खास पार्टीचे आयोजन केले. पार्टीमध्ये डीजे वाजत असतानाच दुसऱ्या बाजूला बापाने मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचे तुकडे तुकडे केले अन् भट्टीत जाळले. ही धक्कादायक अन् भयंकर घटना बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये घडली आहे. गावाच्या चौकीदारामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी क्रूर बापाला अटक केली आहे.

बिहारमधील मुजफ्फरपूरमधील मुशहरी येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. डुमरी गांवातील एका नगरसेवकाच्या मुलीचा जीव एका मुलावर आहे. तो मुलगाही गावातीलच दुसऱ्या वार्डच्या नगरसेवकाचा मुलगा आहे. दोघांमध्ये प्रेम फुललं, घरच्यांचा विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मुलीच्या बापाच्या डोक्यातील राक्षस जागा झाला, त्याने मुलगी घरी आल्यानंतर हत्येचा कट रचला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नरेश पंडित असे आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Crime : प्रेम केलं इतकाच तिचा गुन्हा; निर्दयी बापाने लेकीचा गळा दाबला, तुकडे करून भट्टीत जाळले
Pune : १५८९ किमीचे अंतर फक्त २० तासांत, पुण्यातून दिल्लीसाठी धावणार वंदे भारत स्लीपर

मुलीचा काटा काढण्यासाठी नगरसेवक नरेश पंडित याने पार्टीचे आयोजन केले. जंगी पार्टीमध्ये अनेकांना पाचारण करण्यात आले होते. गावकरी पार्टीमध्ये एन्जॉय करत होते. त्यावेळी नरेश पंडित याने डाव साधला. डीजेच्या आवाजात नरेशने आपल्या पोटच्या लेकीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे गेले. त्यानंतर तुकडे भट्टीमध्ये टाकून जाळून टाकले. डीजेच्या आवाजामुळे कुणाला काहीच समजलं नाही.

Crime : प्रेम केलं इतकाच तिचा गुन्हा; निर्दयी बापाने लेकीचा गळा दाबला, तुकडे करून भट्टीत जाळले
Bhiwandi Crime : नवरा रात्री कामावर गेला, बायकोनं तीन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; सकाळी पतीनं बघताच ढसाढसा रडला

गावातील चौकीदाराला नरेशच्या या कृत्याची कानकून लागली. त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. तपासात पुरावे मिळाल्यानंतर नरेश पंडित याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. खाकीचा धाक दाखवल्यानंतर नरेश पोलिसांसमोर पोपटासारखा बालू लागला. नरेश याने लेकीला मारल्याचा गुन्हा कबूल केलाय. नरेश पंडित याला कोर्टात हजर केले. कोर्टाने नरेशला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Crime : प्रेम केलं इतकाच तिचा गुन्हा; निर्दयी बापाने लेकीचा गळा दाबला, तुकडे करून भट्टीत जाळले
Pune Train : पुणेकरांना रेल्वेचे खास गिफ्ट, आजपासून धावणार नवीन एक्सप्रेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com