Deepali Sayed News: पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा आरोपावर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Deepali Sayed latest News: भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांना दीपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Deepali Sayed News
Deepali Sayed News Saam tv
Published On

रणजित माजगावकर

deepali sayed Latest News: अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबईशी कनेक्शन असल्याचा आरोप त्यांच्या माजी स्वीय सहायकाने आरोप केला होता. माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (latest Marathi News)

दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारले असल्याचा आरोपावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, 'महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा मी करू नये म्हणून माझ्या बदनामीच षडयंत्र रचले जात आहे. माझे फोटो मॉर्फ करून पाकशी संबंध दाखवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझी बदनामी करण्यामागे राजकीय शक्ती असल्याचा मला संशय आहे'.

Deepali Sayed News
Eknath Shinde Criticize Opposition: विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये, त्यांना काय करावं सुचत नाहीये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत माहिती सांगताना त्या म्हणाल्या, 'महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 25, 26 आणि 27 एप्रिलला कोल्हापुरात होणार आहे. अस्थायी समितीच्या वतीने कुस्ती होणार आहे. कुस्तीगीर महासंघाची अधिकृत महिलांची ही स्पर्धा होणार आहे. 10 गटात 45 जिल्ह्यातील 300 हून अधिक महिला पैलवान सहभागी होतील'.

'सांगलीत महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, ती कशी अधिकृत असू शकते? किती भारतीय समिती भारतीय महासंघ आणि शासनामार्फत ज्या स्पर्धा होतात त्या अधिकृत असतात. सांगलीतल्या स्पर्धा जबरदस्तीने घेण्यात आलेल्या आहेत, असेही त्या पुढे म्हणाल्या.

'मी शिवसेनेचीच आहे शिवसेनेतच आहे त्यामुळे माझ्या प्रवेशाचा प्रश्न येत नाही. एक दिवसात ते तिथे जाऊन येऊ शकतात तर काहीही होऊ शकतं, ही राजकारणाची खेळी आहे. इथे प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत आहे,असे उत्तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चांवर दिपाली सय्यद यांनी दिले आहे.

Deepali Sayed News
Military operations in Poonch: जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्य दलाची मोठी कारवाई; एका दहशतवाद्याचा केला खात्मा, २ जखमी

महाविकास आघाडीवर भाष्य करताना म्हणाल्या, 'आपण सूत्र कुणाच्या हातात देतो हे उद्धव ठाकरे यांनी पाहायला हवं होतं. त्या वेळचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारच सगळा कारभार बघत होते. त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ होते. शिवसेनेचा भार हा राष्ट्रवादीकडे चालल्याने उद्धव ठाकरे एकटे पडले'.

'उद्धव ठाकरे संजय राऊतांचं इतकं ऐकत आहेत की इकडे येण्याबाबत ते विचारही करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी डबल इंजिन सरकारसोबत येण्यासंदर्भात विचार करावा, असेही त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com