Malegaon Crime News: मालेगावात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या पोलिसांचा तपास सुरू

मालेगावात वृध्द दांपत्याचा संशयास्पद मृत्यू
Crime News
Crime News Saam TV

Malegaon Crime News: मालेगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबातील पती पत्नी दोघांचे संशयास्पद मृतदेह अढळून आले आहेत. एकाच वेळी दोघांचे मृतदेह मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरवण निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी याचा पंचनामा केला असून अधिक चौकशी सुरू आहे. ( Latest Marathi News )

मालेगाव ( Malegaon) शहरातील हिंगलाजनगर भागात गुरूवारी पहाटे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अलताब हुसेन मोहम्मद सईद आणि अल्कमा अलताब हुसेन अशी मृत दांपत्याची नावे आहेत. अलताबचा मृतदेह जखमी अवस्थेत सापडला तर अल्कमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. दोघांचेही मृतदेह त्यांच्याच राहत्या घरात आढळून आले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Crime News
Crime News: मुंबईत प्रेयसीला प्रियकराकडून बेदम मारहाण; तरुणीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

मिळालेल्या माहितीनुसार अलताब हुसेन मोहम्मद सईद व अल्कमा अलताब हुसेन हे वयस्कर दांपत्य हिंगलाज नगर येथे एकटेच राहत होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला असावा असा अंदाज पोलिस ( Police) वर्तवत आहेत. तसेच विविध शक्यता देखील पोलिस पडताळून पाहत आहेत.

Crime News
#Shorts : दादा भूसेंच्या कार्यकर्त्यांचा मालेगाव पालिकेत राडा

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिती सावंत सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बारकाईने पंचनामा व घटनास्थळी पाहणी केली. आता या संशयास्पद मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com